सरकारी बंगला रिकामा करा! 200 माजी खासदारांना बजावण्यात आली नोटीस
MPs BungalowSaam Tv

MPs Bungalow: सरकारी बंगला रिकामा करा! 200 माजी खासदारांना बजावण्यात आली नोटीस

Lok Sabha Ex Mps Bungalow News: दिल्लीतील बंगला रिकामा करण्यासाठी 200 हून अधिक माजी लोकसभा खासदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Published on

दिल्लीतील लुटियन्स जोन्सचा बंगला रिकामा करण्यासाठी 200 हून अधिक माजी लोकसभा खासदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या खासदारांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. नियमानुसार, एक महिन्याची मर्यादा ओलांडूनही या खासदारांनी बंगला रिकामाला केला नसल्याने त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे, असं सांगण्यात येत आहे.

माजी खासदारांना लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने आपले बंगले लवकरात लवकर रिकामे करण्यास सांगितले आहे, जेणेकरून नवीन खासदारांना या बंगल्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारी बंगला रिकामा करा! 200 माजी खासदारांना बजावण्यात आली नोटीस
Pune News : आधी केली दारू पार्टी, नंतर नशेत घेतला गळफास; अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येने पुणे हादरलं

मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदारांना मागील लोकसभा विसर्जित झाल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करायचे होते. मात्र ही मुदत उलटून गेली आहे, तरीही माजी खासदार बंगला सोडत नाहीत.

'टाइम्स ऑफ इंडिया' शी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, "माजी खासदारांनी बंगले रिकामे न केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली जाईल आणि बंगला रिकामा करण्यासाठी कारवाई पथक पाठवेल जाईल.''

सरकारी बंगला रिकामा करा! 200 माजी खासदारांना बजावण्यात आली नोटीस
Pooja Khedkar: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर सर्वात मोठी कारवाई; प्रशिक्षण कालावधी संपुष्टात,देशातील पहिलीच घटना| Exclusive

दरम्यान, लोकसभेची सदन समिती खासदारांना निवासस्थानांचे वाटप करते, तर केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयांतर्गत इस्टेट संचालनालय मंत्र्यांना बंगले वाटप करते. सूत्रांनी सांगितले की, मोदी सरकार-3.0ची शपथ घेऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असतानाही अद्याप नवीन मंत्र्यांना बंगला देण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com