Thane Police Saam tv
महाराष्ट्र

Thane Police : खासगी बसमधून प्रतिबंधित ९ लाखांचा गुटखा जप्त; ठाणे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Shahapur News : मध्य प्रदेशातील इंदौरमधून एका खासगी लक्झरी प्रवाशी बसमधून गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती. गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या वाशिंद युनिटला मिळाली होती

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: मुंबई- नाशिक महामार्गावर एका लक्झरी बसमधून वाहतूक प्रतिबंधित गुटखा वाहतूक केला जात होता. याबाबत  मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने जप्त केला आहे. इंदोर येथून हा गुटखा ठाणे येथे नेला जात होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत साधारण ९ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. 

मध्य प्रदेशातील इंदौरमधून एका खासगी लक्झरी प्रवाशी बसमधून गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती. गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या वाशिंद युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई- नाशिक महामार्गावर पथकाने सापळा रचला होता. दरम्यान शहापूर तालुक्यातील खर्डी पोलिस ठाण्यात हद्दीत गोलभण येथे लक्झरी बस जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी बस थांबविण्यात आली. 

३९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बसची तपासणी केली असता लक्झरी बसमधून गुटख्याचे पोते आढळून आले. या गुटख्याची तपासणी केली असता बसमध्ये मध्य प्रदेशातील राव सर्कल इंदौर येथून भरून हा ठाणे माजीवडा येथे वाहतूक करून घेऊन जात असल्याचे समजले. याची तपासणी करून साधारण ९ लाख ३७ हजार २०० रूपये किंमतीचा गुटखा व ३० लाखांची लक्झरी बस असा एकूण ३९ लाख ४२ हजार २०० रूपये किंमतीचा माल जप्त करून ताब्यात घेतले आहे.

गुन्हा दाखल करत एकास घेतले ताब्यात 
भारतीय न्याय संहिता कलम तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संशयित आरोपी जोगेंदर प्रसाद शाह यास अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरिक्षक महेश कदम, सुनील कदम, पो. हा. प्रकाश साईल ,संतोष सुर्वे, गोविंद कोळी , गोविंद बोडके या पथकाने कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT