Saif Ali Khan Attack Update: मोठी बातमी! सैफ अली खानवर हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात

Saif Ali Khan Case Update: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराला पोलिस वांद्रे पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Saif Ali Khan Attack Update: मोठी बातमी! सैफ अली खानवर हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात
Saif Ali Khan Saam Tv
Published On

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातात मोठी अपडेट समोर आली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वांद्रे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराला पोलिस वांद्रे पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहेत. तब्बल ३३ तासांनंतर आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

सैफ अली खानवर गुरूवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हल्ला करण्यात आला होता. चोरीच्या उद्देशाने घरामध्ये शिरलेल्या हल्लेखोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान आणि त्याच्या घरामध्ये काम करणाऱ्या दोन मोलकरणी जखमी झाल्या. सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता सध्या डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत आहे.

Saif Ali Khan Attack Update: मोठी बातमी! सैफ अली खानवर हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात
Saif Ali Khan Attack: सैफवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण? सैफवरील हल्ल्याचं बिश्नोई कनेक्शन?

सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणाऱ्या दोन मोलकरणीवर देखील चोराने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. सैफवर हल्ला करणारा आरोपी इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर ३३ तासांनंतर एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा आरोपी सैफवर हल्ला करणारा आहे का याचा पोलिस तपास करत आहेत.

Saif Ali Khan Attack Update: मोठी बातमी! सैफ अली खानवर हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात
Saif Ali Khan Attack: सैफवर हल्ला कसा झाला? मोलकरणीने पोलिसांना सांगितला थरारक घटनाक्रम

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीचाा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध शाखेची २० शोध पथके तयार करण्यात आली आहेत. झोन ९ मधील क्राइम ब्रँचसोबतच एटीसी पथकाचाही समावेश आहे. आरोपी हल्ला करून पळाल्यानंतर साधू वासवानी चौक परिसरात रस्त्यावरच कपडे बदलून वांद्रे स्टेशनकडे जात असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

दरम्यान, सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराबाबत अशी देखील माहिती समोर आली आहे की, हल्लेखोराने वसई विरारच्या दिशेने पलायन केले. हा चोरटा वांद्रे स्थानकातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांचा तपास सुरू असून सीसीटीव्ही तपासण्यात आले आहे. सीसीटीव्हीच्या साहाय्याने चोराचा मागोसा पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांचे पथक वसई विरारच्या दिशेने सुद्धा तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Saif Ali Khan Attack Update: मोठी बातमी! सैफ अली खानवर हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात
Saif Ali Khan Attack: मध्यरात्री १.३७ ची वेळ, पाठीवर काळ्या रंगाची बॅग, संशयित हालचाली; सैफच्या हल्लेखोराचा आणखी एक व्हिडीओ समोर

मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेतील चढाओढीचा फटका तपासाला बसत आहे. वांद्रे पोलिस सगळी माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांचा दावा आहे. मध्य रात्री झालेल्या हल्ल्याची खबर गुन्हे शाखेला तब्बल पाच तासांनी मिळाली. गुन्ह्याशी निगडित सीसीटीव्ही फुटेज आणि डिव्हीआर पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत. पोलिस आणि गुन्हे शाखेतील श्रेयवाद आरोपीच्या पथ्यावर आहे.

Saif Ali Khan Attack Update: मोठी बातमी! सैफ अली खानवर हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात
Shahid Kapoor On Saif Ali Khan: सैफ अली खानच्या हल्ल्यावर शाहिद कपूरची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com