Mahavitaran News : मीटरमध्ये छेडछाड करत वीजचोरी; महावितरणने ५० मीटर घेतले ताब्यात

Jalgaon News : राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविली जात आहे. शहरात तपासणी करण्यासोबतच आता ग्रामीण भागात देखील कारवाई सुरू करण्यात आली वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे
Mahavitaran News
Mahavitaran NewsSaam tv
Published On

जळगाव : महावितरणकडून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावांमध्ये तपासणी करण्यात आली. या तपासणीत काही ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. यामुळे गावातील ५० वीज ग्राहकांचे मीटर तपासणीसाठी महावितरणने ताब्यात घेतले आहेत. यात काही निष्पन्न झाल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 

राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविली जात आहे. शहरात तपासणी करण्यासोबतच आता ग्रामीण भागात देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे वीज चोरी करणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यानुसार गुरुवारी महावितरणचे पथक यावल तालुक्यातील सांगवी बु- या गावात गेले होते. यामध्ये ज्या ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केली आहे; असे संशयीत ५० मीटर तपासणीसाठी काढण्यात आले. 

Mahavitaran News
Black Coffee : दररोज ब्लॅक कॉफी प्यायल्याने मिळतात गुणकारक फायदे; वाचा एका क्लिकवर

डिजिटल मीटर बसविणार 

राज्य विद्युत वितरण कंपनीकडून विविध चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यावल तालुक्यात पथक पोहचून सांगवी गावात करण्यात आली असून लवकरच इतर गावांमध्ये देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने डिजिटल मीटर बसून जुने मीटर काढण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. वीजचोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये सांगवी बुद्रुक गावातील ५० घरांमधील मीटर हे तपासणी कामी काढण्यात आले आहे. मीटर मध्ये छेडछाड झाल्याचा संशय आहे. 

Mahavitaran News
Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराडची परदेशात संपत्ती? मोबाइलमधील सिमकार्ड परदेशात रजिस्टर; तपासातून धक्कादायक माहिती उघड

तर दंड आकारला जाणार 

महावितरणने ताब्यात घेतलेल्या मीटरची वरिष्ठ पातळीवर तपासणी केली जाणार आहे. तर आता नागरिकांच्या घरात पूर्वीचे जुने मीटर एवजी नवीन स्मार्ट डिजिटल मीटर लावले जाणार आहेत. अशा संशयीत मीटर मधील तफावत व संबंधितांनी चोरी केलेलील असल्यास त्यांची तपासणी केली जाणार आहे. यात काही आढळून आल्यास वीज युनिट नुसार त्यांना दंडाची नोटीस दिली जाणार असल्याचे विद्युत वितरण कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com