Shahapur News
Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur News : हॉटेलमध्ये धाडसी चोरी; मुंबई- आग्रा महामार्गावर मध्यरात्रीची घटना

Rajesh Sonwane

फय्याज शेख 

शहापूर : मुंबई- आग्रा महामार्गावरील धाडसी चोऱ्यांचे सत्र अजूनही थांबवायचं नाव घेत नाही. सहा दिवसांपूर्वी (Shahapur) तळेगाव शिवारातील वाईन शॉपमध्ये पावणेतीन लाखाची जबरी चोरी (Theft) झाली होती. यानंतर याचा वाईन शॉपीपासून ५०० मिटर अंतरावर असणाऱ्या हॉटेल शाही प्लाझा येथे मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. (Maharashtra News)

मुंबई- आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) हॉटेल शाही प्लाझा येथे चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलच्या किचनची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर एक लाख पाच हजार रुपये रोख व जवळपास एक लाख रुपयांच्या महागड्या स्कॉचच्या मोठ्या मद्याच्या बाटल्या असा जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. घटनेस्थळी पोलीस (Police) निरीक्षक राहुल तसरे यांनी भेट दिली असुन श्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ञांचे पथक यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. या घटनेचा अधिक तपास  इगतपुरी पोलीस करीत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी चोरी करताना चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायरी तोडून डिव्हीआरच चोरी करून लूट केली आहे. तर मागील महिन्यात एका निवृत्त शिक्षकाला पोलीस असल्याचे भासवत दोन जणांनी एक लाख रुपयाला गंडा घातला होता. सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे चोरट्यांनी पोलीसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या घटनेमुळे महामार्गावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. सतत होणाऱ्या चोऱ्यांच्या या घटनेमुळे व्यवसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वेळीच जर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर व्यवसाय करणे अवघड जाणार असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पुणे येथील Hit And Run प्रकरणातील अल्पवयीन मुलाला 12 तासात जामीन

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Today's Marathi News Live: नवी मुंबईत या वाहनांना प्रवेश बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

SCROLL FOR NEXT