सागर निकवाडे
नंदूरबार : शेतकऱ्यांचे पांढर सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाला यंदा अजूनही चांगला भाव मिळत नाही. यामुळे (Farmer) शेतकरी कापूस घरातच साठवणूक करून ठेवत आहे. परंतु कापूस किती दिवस घरात (Nandurbar) साठवणूक करून ठेवणार असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Tajya Batmya)
यंदाच्या हंगामात अगदी सुरवातीपासूनच कापसाला चांगला भाव (Cotton Price) मिळाला नाही. सुरवातीला ७ ते साडेसात हजार इतका दार राहिला. मात्र त्यानंतर सातत्याने कापसाच्या दारात घसरण होत गेली. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवणूक केली. ही साठवणूक करून ठेवत असल्यामुळे कापसाची कॉलिटी खराब होणार, त्यामुळे कापसाला भाव मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कापसाला सध्या सहा हजार ते ७ हजार पर्यंतच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे कापूस विक्रीकडे पाठ फिरवला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोठं नुकसान झालं होतं. तर दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्यांसमोर उद्भवली आहे. दुष्काळामुळे कसंतरी कापूस पीक जगावलं मात्र कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.