Gulabrao Patil : निवडणुकांना एक वर्ष बाकी, निवडणुका आल्या म्हणून विकास काम करत नाही; मंत्री गुलाबराव पाटलांचे विरोधकांना उत्तर

Jalgaon News : रोज मी माझा कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना त्रास देत असतो. रोज हे माझ्यामागे असतात. यांचे मला जे सहकार्य लाभत आहे,
Gulabrao Patil
Gulabrao PatilSaam tv

जळगाव : राजकारण काय राजकारण सुरूच राहील. राजकारण म्हणजे छापा- काटा. निवडणुकांच्या (Jalgaon) आखाड्यातील कुस्ती होईल तेव्हा पाहून घेऊ. पण जे सामाजिक काम करतो आहे. त्याच्यामुळे रात्री लेटल्याबरोबर शांत झोप लागते या शब्दात जळगाव ग्रामीण मतदार संघातील विकास कामांवरून टीका करणाऱ्या (Gulabrao Patil) विरोधकांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. (Latest Marathi news)

Gulabrao Patil
Breaking News:'गरुडझेप' कोचिंग सेंटर की छळछावणी? प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, Video व्हायरल

जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी अनोख्या शैलीत विरोधकांवर फटकेबाजी केली आहे. रोज मी माझा कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना त्रास देत असतो. रोज हे माझ्यामागे असतात. (Jalgaon Political News) यांचे मला जे सहकार्य लाभत आहे, असे कार्यकर्ते पदाधिकारी लाभले आहे याचा मला अभिमान असून हीच माझी कमाई असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gulabrao Patil
Success Story : पठ्ठ्यानं करुन दाखवलं! कोकणात कलिंगड शेतीतून मिळविले लाखाेंचे उत्पन्न; वाचा नाईकांची यशाेगाथा

निवडणुका आल्या म्हणून विकास काम किंवा सामाजिक काम करत नाहीये. विधानसभा निवडणुकांनाच म्हणजे माझ्या मतदानाला अद्याप एक वर्ष अवकाश आहे. परंपरागत दोन वर्षापासून हे काम सुरू आहेत. आगामी काळात शेतकऱ्यांना पिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा असलेल्या झटका मशीनचे वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी झटका मशीन घ्यावं आणि मला मतदान करून समोरच्याला झटका द्यावा; असं मिश्किल वक्तव्य सुद्धा गुलाबराव पाटील यांनी केले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com