Madhukar Chakradev Passed away  Saam Tv
महाराष्ट्र

RSS Leader: हृदय विकाराच्या झटक्याने आरएसएसचे ज्येष्ठ सदस्य मधुकर चक्रदेव यांचे निधन

Madhukar Chakradev Passed away : डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे संस्थापक संचालक मधुकर चक्रदेव यांचे आज निधन झाले. डोंबिवलीतील आयकॉन हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

Bharat Jadhav

(अभिजीत देशमुख)

RSS Senior Leader Madhukar Chakradev Passed away :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व विभाग संघचालक, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे संस्थापक संचालक मधुकर चक्रदेव यांचे ८४ व्या वर्षी निधन झाले. डोंबिवलीतील आयकॉन हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. चक्रदेव यांना आज सकाळी हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. (Latest News)

चक्रदेव यांच्या मृतदेहावर डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडो डोंबिवलीकर उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगा आणि मुलगी आहे. मधुकर चक्रदेव हे डोंबिवली जिमखाना, पेण येथील विविध संस्थांचा आधारस्तंभ होते. मधुकर चक्रदेव यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचा आधारवड हरपलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरएसएसचे काम सर्वदूर पसरविण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप मेहनत घेतली होती. डोंबिवली उत्सवा सारखे अनेक उपक्रम राबविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. आपल्या मधुर बोलण्याने, निरपेक्ष वागण्याने, सर्वांना मदत करण्याच्या प्रवृतीने, शिस्त पालनाने त्यांनी डोंबिवलीतील अनेक संस्थांचा कारभार सुधारला. संस्था नावारूपाला आणल्या.

आर्थिक पायावर भक्कम उभ्या केल्या. प्रत्येक कार्यकर्त्याला वैयक्तिकरित्या ते ओळखत असत. त्याची विचारपूस करीत असत. स्वयंसेवकांच्या घरातील एक वडीलधारा माणूस आज गेल्याची खंत व्यक्त केली जातेय. जिमखान्याच्या माध्यमातून अनेक क्रीडाविषयक राबविण्यात, जीमखान्यासाठी शासनाकडून मैदान मिळवून घेण्यात मधुकर चक्रदेव यांचा मोलाचा वाटा होता. स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृति समिती, डोंबिवली नागरी अभिवादन समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Fasting: गुरुवारी उपवास केल्याने कोणते लाभ होतात?

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT