Fathima Beevi Death News: सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचं निधन, केरळमध्ये घेतला अखेरचा श्वास

Fathima Beevi No More: सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या न्यायाधीश आणि तामिळनाडूच्या माजी राज्यपाल न्यायाधीश फातिमा बीवी यांचं आज गुरुवारी निधन झालं.
Fathima Beevi Death News:
Fathima Beevi Death News:Saam tv
Published On

Fathima Beevi Death News:

सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या न्यायाधीश आणि तामिळनाडूच्या माजी राज्यपाल न्यायाधीश फातिमा बीवी यांचं आज गुरुवारी निधन झालं. केरळमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९६ वर्षांच्या होत्या.'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबत वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

न्यायाधीश फातिमा बीवी यांच्या निधनानंतर केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. वीना जॉर्ज यांनी म्हटलं की, सुप्रीम कोर्टात पहिल्या न्यायाधीश आणि तामिळनाडूच्या राज्यपाल या म्हणून त्यांनी जनमानसात एक वेगळी ओळख निर्माण केली'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Fathima Beevi Death News:
Odisha News: क्लास बंक केल्याने सरांनी दिली शिक्षा... चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; शाळेत काय घडलं?

जॉर्ज पुढे म्हणाल्या, 'त्या धाडसी होत्या, न्यायाधीश फातिमा बीवी यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांच्या जीवनातून प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येऊ शकते असं शिकायला मिळतं.'.

केरळमध्ये करियरला सुरुवात

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) पहिल्या न्यायाधीश पदावर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. फातिमा यांनी केरळमध्ये वकील म्हणून करियरला सुरुवात केली. त्या सुप्रीम कोर्टात १९८३ साली पहिल्या न्यायाधीश झाल्या.

फातिमा बीवी यांनी पथानामथिट्टाच्या कॅथलिक शाळेत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिरुवनंतपुरम येथील कॉलेजमधून विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.

पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गव्हरमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. कायद्याचं शिक्षण (Education) पूर्ण झाल्यानंतर केरळमध्ये त्यांनी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Fathima Beevi Death News:
Patna High Court: जबरदस्तीने भांगेत कुंकू भरलं तरी लग्न मानलं जाणार नाही; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

१९७४ साली फातिमा या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश झाल्या. पुढे १९८३ साली त्या सुप्रीम कोर्टात न्यायाधीश झाल्या.

Fathima Beevi Death News:
DeepFakeबाबत केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, नवीन कायदा आणण्याच्या तयारीत; आजच्या बैठकीत काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com