Patna High Court: जबरदस्तीने भांगेत कुंकू भरलं तरी लग्न मानलं जाणार नाही; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

Patna High Court on Forcibly Applying Sindoor: एखाद्याने जबरदस्तीने महिलेच्या भांगेत कुंकू भरलं तरी हिंदू विवाह कायद्यांतर्गंत त्याला लग्न म्हणून मान्यता मिळणार नाही,असा महत्वपूर्ण निर्णय पटना हायकोर्टाने दिला आहे.
Court News
Court NewsSaam Digital
Published On

Patna High Court On Marriage:

बिहारमधील एका विवाह प्रकरणात मोठा निर्णय हायकोर्टाने दिला आहे. एखाद्याने जबरदस्तीने महिलेच्या भांगेत कुंकू भरलं तरी हिंदू विवाह कायद्यांतर्गंत त्याला लग्न म्हणून मान्यता मिळणार नाही,असा महत्वपूर्ण निर्णय पटना हायकोर्टाने दिला आहे. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, बिहारमधील एका विवाह संबंधित प्रकरणावर पटना हायकोर्टाने महत्वाची टिप्पणी केली आहे. सप्तपदीचा विधी न करता विवाह होत असेल तर त्याला वैध मानलं जाणार नाही. लग्न करण्यासाठी संपूर्ण विधी पूर्ण करावा लागेल. लग्न करताना आधी सप्तपदी विधी करावी लागते. त्यानंतर भांगेत कुंकू भरला जातो. लग्न करण्यासाठी लग्नाची संपूर्ण प्रक्रिया करावी लागेल. लग्न करण्यासाठी जबरदस्तीने महिलेच्या भांगेत कुंकू भरला असेल त्या विवाहास मान्यता मिळणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Court News
Uttarakhand Tunnel Accident Update: ड्रिलिंग.. रुग्णवाहिका ते हॉस्पिटल.. उत्तरकाशी बोगद्यातील रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत पोहोचलं? 10 अपडेट्स

पटना हायकोर्टाच्या न्यायपूर्ती पीबी बजंथरी आणि अरुण कुमार झा यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. या खंडपीठाकडून १० नोव्हेंबर रोजी बळजबरीने करण्यात आलेला विवाह रद्द करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

रविकांत हा सैन्य दलातील जवान आहे. त्याने १० वर्षांपूर्वी लखीसराय जिल्ह्यात एका तरुणीचं अपहरण केलं होतं. त्यानंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केला. लग्न करण्यासाठी तरुणी तयार नव्हती. ३० जून २०१३ मध्ये पीडितचं काही लोकांनी अपहरण केलं. त्यानंतर तिला एका मंदिरात आणलं. पुढे या जवानाने या मंदिरातील पूजेदरम्यान तरुणीच्या भांगेत कुंकू भरण्याचं कृत्य केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या तरुणीचा जवानाशी विवाह करून देण्यात आला.

या घटनेनंतर रविकांतच्या काकाने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर पीडितेने लखीसरायच्या कोर्टात धाव घेत तक्रार दाखल केली. तिने कौटुंबिक न्यायालयातही याचिका दाखल केली. मात्र, पीडितेची याचिका २७ जानेवारी २०२० रोजी फेटाळण्यात आली. तर लखीसरायच्या कोर्टाने दखल न घेतल्यामुळे पीडितीने पटना हायकोर्टात धाव घेतली.

Court News
DeepFakeबाबत केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, नवीन कायदा आणण्याच्या तयारीत; आजच्या बैठकीत काय झालं?

पटना हायकोर्टाने निर्णय देताना काय म्हटलं?

पटना हायकोर्टानं म्हटलं, 'हिंदू विवाह कायद्याचा अभ्यास केला तर स्पष्ट होतं की, वधू आणि वराने सोबत सप्तपदीचा विधी केला तर विवाह पूर्ण होतो. लग्न करण्यासाठी सप्तविधी बंधनकारक देखील आहे. मात्र, लग्नावेळी सप्तपदीचा विधी पूर्ण झाला नाही, तर त्याला लग्न म्हणून मान्यता मिळणार नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com