Priya More
विजयादशमीनिमित्त नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
विजयादशमीनिमित्त नागपूरमध्ये आरएसएसचा शस्त्रपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला.
दरवर्षीप्रमाणे नागपूरच्या रेशीमबागमध्ये आरएसएसकडून स्थापना दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला गायक शंकर महादेवन आणि मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने हजेरी लावली.
आरएसएसच्या या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वांना संबोधित केले.
राम मंदिर, जी-२० परिषद, मणिपूर हिंसाचारासह अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर मोहन भागवत यांनी लक्ष वेधलं.
'काही लोकांना देशाची प्रगती पाहायची नाही, भारतामध्ये राहून ते भारताचाच विरोध करत आहेत.', अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
दसऱ्याचा हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रमुख कार्यक्रम आहे.
आरएसएच्या या कार्यक्रमादरम्यान स्वयंसेवकांनी उपस्थित अतिथींसमोर विविध कवायतींचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
आरएसएसची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी सप्टेंबर 1925 मध्ये दसऱ्याच्या दिवशी केली होती.