Satej Patil saam tv
महाराष्ट्र

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election : राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या अडचणी वाढल्या, सतेज पाटलांच्या निर्णयाकडे लक्ष

Satej Patil News: आज सतेज पाटील त्यांचा निर्णय जाहीर करतील.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष केंद्रित करणाऱ्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Latest Updates) 23 एप्रिलला आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरुद्ध काँग्रेसचे आमदार माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे पॅनल या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. दरम्यान सतेज पाटील यांच्या गटाचे अपात्र 29 उमेदवारांचे अपिल नामंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे सतेज पाटील (satej patil) यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे दाखल केलेले अपील नामंजूर करण्यात आले आहे. याबाबत निकालाच्या प्रति रविवारी रात्री १२ वाजता संबंधितांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

निवडणूक कार्यक्रम सुरू असल्यामुळे, यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी असणार. बुधवार दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. गुरुवार दि. १३ रोजी चिन्हासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार.

दरम्यान निर्णय विरोधात गेल्याने राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने यावर उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार अशी प्राथमिक माहिती उपलब्ध हाेत आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे आमदार माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

लास्ट स्टेजमधील कॅन्सर बरा होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT