Shirdi Latest News : साईंच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी 'ही' गाेष्ट लक्षात ठेवा, तुमचाच हाेईल फायदा

शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंगची सुविधा सुरु हाेत असल्याने भाविक आनंदित झालेत.
shirdi, Sai Baba, Coronavirus, Covid-19
shirdi, Sai Baba, Coronavirus, Covid-19saam tv
Published On

- सचिन बनसोडे

Shirdi News : गुड फ्रायडेच्या सुटीनंतर शनिवार-रविवार जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे लाखो साईभक्त शिर्डीत (shirdi) दाखल होत आहेत. दरम्यान राज्यात काेराेनाचा (maharashtra coronavirus update) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काही भाविकांनी स्वत:हून मास्कचा वापर (devotees are wearing mask in shirdi) सुरु केला. तसेच शिर्डीत काही ठिकाणी मास्क वापरण्याचे भाविकांना आवाहन केले जात आहे. (Breaking Marathi News)

shirdi, Sai Baba, Coronavirus, Covid-19
Nitin Gadkari's Panvel Speech: खरोखर मी थकलाेय आता, इजा...बिजा.. आता तिजा असं का म्हणाले नितीन गडकरी (पाहा व्हिडिओ)

देशात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं अवाहन केलं जात आहे.

सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. साई मंदिराच्या दर्शनरांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचं चित्र आहे. सरकारने अद्याप कुठलीही सक्ती केली नसली तरी गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी स्वतःहून काळजी घेतली पाहिजे असा सूर आज शिर्डीत हाेता. शिर्डीत येणारे काही साईभक्त स्वतःहून मास्क वापरत असून अनेक साईभक्त मास्क वापरत नसल्याचं दिसून येत आहे.

shirdi, Sai Baba, Coronavirus, Covid-19
Saam Impact : आश्रमातून Chulivarcha Baba गायब, दरबार भरलाच नाही (पाहा व्हिडिओ)

शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंगची सुविधा

शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंगची सुविधा सुरू होत आहे. दिल्लीहून इंडिगो कंपनीचे पहिले विमान रात्री आठ वाजता शिर्डी विमानतळावर उतरणार आहे. सन २०१७ साली सुरू झालेल्या शिर्डी विमानतळाने अल्पावधीतच मोठी भरारी घेतली आहे.

shirdi, Sai Baba, Coronavirus, Covid-19
Satara Covid-19 Update : संकटातून बाहेर पडताच पालकमंत्री शंभूराज देसाईंनी घेतली Corona च्या उपाययाेजनांसाठी बैठक; जाणून घ्या आजची रुग्णसंख्या

नाईट लँडिंग सुरू होणार असल्याने साईभक्तांना शिर्डीत येणे अधिक सुकर होणार आहे. या निमित्त स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान शिर्डीत दाखल झाल्यानंतर भाविकांनी मास्कचा जरुर वापर करावा. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग वाढणार नाही असे आवाहन केले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com