Satara Covid-19 Update : संकटातून बाहेर पडताच पालकमंत्री शंभूराज देसाईंनी घेतली Corona च्या उपाययाेजनांसाठी बैठक; जाणून घ्या आजची रुग्णसंख्या

गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Satara, Shambhuraj Desai, Covid-19, Coronavirus, Wear Mask
Satara, Shambhuraj Desai, Covid-19, Coronavirus, Wear Masksaam tv
Published On

Satara Covid-19 Update : सातारा जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने आज (शुक्रवार) दिलेल्या माहितीनूसार जिल्ह्यात आजमितीस 93 बाधित रुग्ण (satara coronavirus news) आहेत. दरम्यान काेराेनाच्या संसर्गातून बाहेर पडताच पालकमंत्री शंभूराज देसाईंनी बैठकांचा सपाटा लावला आहे. रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी केले आहे. (Maharashtra News)

Satara, Shambhuraj Desai, Covid-19, Coronavirus, Wear Mask
Maharashtra Gram Panchayat By Election: कडक उन्हाळ्यात गावगाड्याचे राजकारण तापणार; थेट सरपंच पाेटनिवडणुकीची तारीख जाहीर

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोना संदर्भात नुकतीच पालकमंत्री देसाई यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध विभागांकडून उपाययाेजनेची माहिती पालकमंत्री देसाईंनी घेतली. शासकीय आरोग्य यंत्रणा औषधसाठयासह संपूर्णपणे सज्ज असून लक्षणे आढळल्यास नागरिकांनी स्वत: पुढे यावे असे आवाहन देसाईंनी केले.

या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Satara, Shambhuraj Desai, Covid-19, Coronavirus, Wear Mask
'Narayan Rane भुंकण्याचा काम करताे, शिव्या घालण्याशिवाय बाकी काही काम नाही'

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना तोंडवर मास्क लावावा असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले. दरम्यान आज सातारा जिल्ह्यात 93 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली आहे. 13 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात दरराेज बाधितांची टक्केवारी 13.22 असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com