Satara Politics Jaykumar Gore Vs Anil Desai:  Saamtv
महाराष्ट्र

Satara News: 'उदयनराजेंना तिकीट मिळू नये म्हणून जयकुमार गोरेंच्या दिल्लीला फेऱ्या', अनिल देसाईंचे गंभीर आरोप; साताऱ्यात राजकारण तापलं!

Satara Politics Jaykumar Gore Vs Anil Desai: एकीकडे विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच माण खटावमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.

Gangappa Pujari

ओंकार कदम, सातारा|ता. ११ जुलै २०२४

'खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेचे तिकीट मिळू नये यासाठी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या,' असा खळबळजनक आरोप जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केला आहे. अनिल देसाईंच्या या आरोपांमुळे साताऱ्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच माण खटावमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवरुन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

"खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट देऊ नये म्हणून आमदार जयकुमार गोरे यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या असल्याचा मोठा दावा अनिल देसाई यांनी केला आहे. उदयनराजेंची उमेदवारी अडचणीत आहे असे आमदार गोरे यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांनी भाजपच्या वरिष्ठांना सांगितलं होते," असे अनिल देसाई यांनी म्हटले आहे.

तसेच "ज्यावेळी खासदार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडून आले. तेव्हा त्यांनी भाजपच्या कार्यालयात गेल्यावर पहिल्यांदा तिथे लावलेला आमदार जयकुमार गोरे यांचा फोटो बाहेर फेकून दिला होता," असा गौप्यस्फोटही अनिल देसाई यांनी केला आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे माण- खटावचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण; बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून मृत्यू

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

SCROLL FOR NEXT