Vidhan Sabha Election 2024: विधानसभेसाठी भाजप अलर्ट मोडवर! पक्षांतर्गत ऑपरेशन सुरू, अनेक पदाधिकारी बडतर्फ; नागपूरमध्ये पहिली कारवाई

BJP Initiates Intra Party Operation: लोकसभेच्या निकालानंतर भाजप आता विधानसभा निवडणुकीसाठी अलर्ट मोडवर आहे. याची सुरूवात पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघापासून झाल्याचं दिसत आहे.
विधानसभेसाठी भाजप अलर्ट मोडवर
Vidhan Sabha Election 2024Saam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

राज्यात लोकसभेत भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आता कंबर कसून तयारीला लागल्याचं चित्र आहे. भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटक मजबूत करतांना कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि कार्यकारणी यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

विधानसभेसाठी भाजप अलर्ट मोडवर

लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांची मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत मताधिक्य घटल्याने कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हेच पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार (Vidhan Sabha Election 2024) आहे. त्यामुळं या कारवाईनंतर नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. २५ जुलैपर्यंत नविन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती मिळतेय.

भाजपचं पक्षांतर्गत ऑपरेशन सुरू

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपकडून (BJP) आणखी काही मतदार संघात अश्या पद्धतीने कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी तयार केलेली यंत्रणा अयशस्वी ठरल्यामुळे भाजपने आता विधानसभेसाठी पक्षांतर्गत ऑपरेशन सुरू केलंय. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघापासून या ऑपरेशनची सुरूवात झालेलं आहे.

विधानसभेसाठी भाजप अलर्ट मोडवर
BJP Vs Congress Video: पुण्यात काँग्रेस भाजप आमनेसामने, काँग्रेस भवनबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त; नेमका वाद काय? वाचा...

पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

वर्षभर निवडणूक मोडमध्ये असलेली भाजप पक्षाची तयारी आणि निवडणकीचा निकाल यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला (Nagpur News) होता. भाजपच्यावतीने लोकसभेसाठी पन्ना प्रमुख घर चलो अभियान, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, संपर्क अभियान असे कार्यक्रम राबवण्यात आले होते. परंतु तरीही अपेक्षित यश मिळालं नसल्यामुळे आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पडल्यामुळे भाजपने (West Nagpur Constituency) पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

विधानसभेसाठी भाजप अलर्ट मोडवर
BJP Mla VIDEO : माझ्या मतदारसंघात पाय ठेवाल तर जागेवरच बदली करून टाकेन; भाजप आमदाराचा पोलिसांना सज्जड दम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com