BJP Mla VIDEO : माझ्या मतदारसंघात पाय ठेवाल तर जागेवरच बदली करून टाकेन; भाजप आमदाराचा पोलिसांना सज्जड दम

BJP Mla Abhimanyu Pawar VIDEO : माझ्या मतदारसंघात अजिबात फिरकायचं नाही. गरीबांना लुटाल तर जागेवरच बदली करून टाकेन, असा सज्जड दम भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी वाहतूक पोलिसांना दिला.
माझ्या मतदारसंघात पाय ठेवाल तर जागेवरच बदली करून टाकेन; भाजप आमदाराचा पोलिसांना सज्जड दम
BJP Mla Abhimanyu Pawar VIDEO Saam TV
Published On

माझ्या मतदारसंघात अजिबात फिरकायचं नाही. गरीबांना लुटाल तर जागेवरच बदली करून टाकेन, असा सज्जड दम भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना दिलाय. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामुळे याच मुद्द्याला हाताशी धरून विरोधक सरकारला चांगलंच धारेवर धरण्याची शक्यता आहे.

माझ्या मतदारसंघात पाय ठेवाल तर जागेवरच बदली करून टाकेन; भाजप आमदाराचा पोलिसांना सज्जड दम
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी वारं फिरलं, भाजपचा बडा नेता आज शिवबंधन बांधणार, उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार!

आमदार अभिमन्यू पवार (Mla Abhimanyu Pawar) हे लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर-सोलापूर महामार्गावर वाहतूक पोलिसांकडून वाहनाची तपासणी सुरू होती.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस (Traffic Police) कारवाई करीत होते. तसेच वाहनचालकांनी थकवलेला दंडही वसूल करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी एका वाहनचालकाने फोन करून आमदार अभिमन्यू पवार यांना बोलावून घेतलं.

कार्यकर्त्यांना आर्थिक भूर्दंड बसून नये म्हणून या आमदार महोदयांनी तातडीने पदाधिकाऱ्यांसह लातूर-सोलापूर महामार्गाकडे धाव घेतली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आमदार पवार यांनी बाचाबाची केली.

माझ्या मतदारसंघात फिरकायचं नाही, असा दम त्यांनी वाहतूक पोलिसांना दिला. इतकंच नाही तर गरीबांना लुटाल तर जागेवरच बदली करून टाकेन, असा धमकीवजा इशाराही आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलिसांना दिला.

धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी पोलिसांना अरेरावीची भाषा देखील वापरल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सत्ताधारी भाजपचे आमदार अशा प्रकारे वाहतूक पोलिसांना धमकावत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल अनेकजण उपस्थित करीत आहेत.

माझ्या मतदारसंघात पाय ठेवाल तर जागेवरच बदली करून टाकेन; भाजप आमदाराचा पोलिसांना सज्जड दम
Maharashtra Politics : शिवसेना नेमकी कुणाची? आता लवकरच होणार फैसला; सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख ठरली!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com