Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी वारं फिरलं, भाजपचा बडा नेता आज शिवबंधन बांधणार, उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार!

Shivsena vs BJP Latest News : छत्रपती संभाजीनगरमधील भाजपाचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर राजू शिंदे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे काही कार्यकर्ते देखील शिवबंधन बांधणार असल्याची माहिती आहे.
 विधानसभेपूर्वी वारं फिरलं, भाजपचा बडा नेता आज शिवबंधन बांधणार, उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार!
Devendra Fadnavis on Uddhav ThackeraySaam tv

लोकसभा निवडणुकीत ९ जागा जिंकल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा चांगलाच आत्मविश्वास वाढला आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. आज उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यादरम्यान, भाजपच्या बड्या नेत्यासह काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

 विधानसभेपूर्वी वारं फिरलं, भाजपचा बडा नेता आज शिवबंधन बांधणार, उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार!
Maharashtra Politics : आमचं प्रेम वेगळं, शरद पवारांच्या खासदाराला आम्ही निवडून आणलं; अजितदादांच्या आमदारांची कबुली

छत्रपती संभाजीनगरमधील भाजपाचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर राजू शिंदे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे काही कार्यकर्ते देखील शिवबंधन बांधणार असल्याची माहिती आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेलो पाहिजे, अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा असल्याचं राजू शिंदे यांनी म्हटलंय.

भाजप फक्त शिवसेना शिंदे गटाचे काम करण्यासाठीच राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही शिंदे गटाला मदत करूनही त्यांनी आमचे साधे आभारही मानले नाहीत, अशी खदखद देखील राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवकांनी बोलून दाखली आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सर्वकाही ठीक होतं. पण निकालानंतर शिंदे गट आम्हीच मोठा भाऊ असल्याचं सांगत आम्हाला हिणवत असल्याचंही राजू शिंदे म्हणाले.

दरम्यान, राजू शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप तसेच शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू होते. अगदी केंद्रीय मंत्री भागवत कराड, तसेच रावसाहेब दानवे यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. मात्र, तरी देखील राजू शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम होते. आज त्यांच्यासोबत भाजपचे किती नगरसेवक शिवबंधन बांधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यामुळे त्यांनी जर ठाकरे गटात प्रवेश केला, तर शिंदेंच्या शिवसेनेची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे. कारण, हा मतदारसंघ सध्या शिंदे गटाच्या ताब्यात असून संजय शिरसाठ याठिकाणी विद्यमान आमदार आहेत. दरम्यान, आजच्या शिवसंकल्प मेळाव्यातून उद्धव ठाकरे विधानसभेचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

 विधानसभेपूर्वी वारं फिरलं, भाजपचा बडा नेता आज शिवबंधन बांधणार, उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार!
Maharashtra Politics : शिवसेना नेमकी कुणाची? आता लवकरच होणार फैसला; सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख ठरली!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com