Satara Local Crime Branch
Satara Local Crime Branch Saamtv
महाराष्ट्र

Satara Police News: दुचाकी, चारचाकी वाहने चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, सातारा गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तब्बल 1 कोटी 18 लाखाचा मुद्देमाल जप्त

Gangappa Pujari

ओंकार कदम, प्रतिनिधी...

Satara Police News: सातारा (Satara) पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी आणि चार चाकी गाड्या चोरी करणारी आंतर राज्यीय टोळी जेरबंद केली आहे. या आरोपींकडून 10 चार चाकी वाहने आणि 8 दुचाकी असा एकूण 1 कोटी 18 लाख 20 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच या आरोपींनी बहुतांशी वाहने ही उत्तर प्रदेशहून चोरी केल्याचेही चौकशीत समोर आले आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी आणि चार चाकी गाड्या चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश (UttarPradesh), दिल्ली (Delhi) या ठिकाणाहून गाड्या चोरी केल्यानंतर या टोळीने सातारा, रायगड (Raigad) जिल्ह्यांमध्ये त्याची विक्री केली होती. सातारा स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रहिमतपूर येथील अजीम सलीम पठाण, आणि कोल्हापूर येथील अजित अण्णाप्पा तिथे या दोन चार चाकी वाहने चोरणाऱ्या आरोपींना अटक केली.

या आरोपींनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या पाच आरोपींची नावे सांगितली. यामध्ये साताऱ्यातील कोडोली येथील महेश अवघडे, बाबाची वाडी येथील संतोष बाबर कोंडवे येथील वैभव बाबर मसूर येथील कृष्णात रत्नकांत काकडे उंब्रज येथील अमित बैले यांचा समावेश होता.

या पाच आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने चार चाकी आणि दुचाकी प्रकरणात अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 1 व्हॅगनार कार,1 इनोवा क्रिस्टा, 4 क्रेटा कार, 1 ब्रिझा मारुती,1 होंडा सिटी कार, 1 मारुती स्विफ्ट कार, 1 मारुती बलेनो अशा 10 आधुनिक गाड्या जप्त केल्या आहेत. यामध्ये दुचाकीमध्ये होंडा, एक्टिवा, मोपेड अशा 8 दुचाकींचाही समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सातारा स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: अप मार्शल निविदा प्रकरणात घोटाळा? जुन्याच टेंडरवर नव्याने काम दिल्याचा प्रकार उघडकीस?

Prajakta Mali : "वादळापूर्वीची शांतता..."; प्राजक्ता माळी असं का म्हणतेय ?

Rashid Khan Six: पैज लावा, असा शॉट पाहिलाच नसेल! राशिदने खेचला 'स्नेक स्टाईल' षटकार

Skin Care: चेहऱ्यावर साबण लावताय?होऊ शकतात या गंभीर समस्या

Ananya Panday : क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो

SCROLL FOR NEXT