Beed Child Marriage: दुपारी थांबवले पण सायंकाळी थाटामाटात लागले लग्न; बीड जिल्ह्यात बालविवाहाला तालुका प्रशासनाचे पाठबळ?

Beed Child Marriage News: अनेक बालविवाहाची प्रकरणे समोर येत असताना विस्तार अधिकारी, आणि ग्रामसेवकही कारवाई करायला टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर...
Beed Child Marriage News
Beed Child Marriage NewsSaamtv

Beed News: राज्यात बालविवाहाचा (Child Marriage) मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यामघ्ये बीड जिल्हा आघाडीवर असून सर्वाधिक बालविवाह बीड जिल्ह्यात (Beed) होत असल्याची माहितीही समोर आली होत. मात्र एकीकडे बाल विवाहाचे प्रमाण वाढत असताना बीडच्या आष्टी तालुक्यातील तहसीलदार, बीडीओ, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांना त्याचे कोणतेच सोयर सुतक नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ज्यामुळे बालविवाहाला तालुका प्रधासनाचं पाठबळ देतयं की काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

Beed Child Marriage News
Virar News: धक्कादायक! विरारमध्ये दुर्दैवी घटना, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू, सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

काय आहे प्रकरण?

बीडच्या आष्टी तालुक्यात काल दोन बालविवाह (Child Marriage) रोखण्यात आले होते. मात्र दुपारी रोखलेला एक बालविवाह सायंकाळी मोठ्या थाटामाटात मंगल कार्यालयात झाल्याचा धक्कादायक खुलासा चाईल्ड लाईन सदस्य तत्त्वशील कांबळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे याचे फोटो तत्त्वशील कांबळे यांनी संबंधितक ग्रामसेवक, त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पाठवले.

मात्र पोलीस प्रशासनाने ग्रामसेवकांना तक्रार द्यायला पाठवा, आम्ही गुन्हा दाखल करून घेतो, असे उत्तर दिले. तर ग्रामसेवकाने या प्रकरणात आम्ही दुपारी बालविवाह रोखले आहेत, नोटीस दिली आहे, मात्र नंतर काय झालं हे माहित नाही. अशी उडवा उडवीची उत्तर देत तक्रार देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे.

Beed Child Marriage News
Nashik Crime News: नाशिक हादरले! लहान भावाकडून मोठ्या भावाची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ...

विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनकडे होती. यामुळे गेल्या चार दिवसांपासून चाईल्ड लाईन सदस्य तत्त्वशील कांबळे यांनी आष्टीचे तहसीलदार विनोद गुंडमवार, यांना जवळपास 40 फोन केले. मात्र एकाही फोनचे उत्तर गुंडमवार यांनी दिले नाही.

तर बीडीओ सुधाकर मुंडे यांना अनेक वेळा कॉल केला. मात्र त्यांनी देखील काहीच रिस्पॉन्सस दिला नाही. त्याचबरोबर विस्तार अधिकारी, आणि ग्रामसेवकही कारवाई करायला टाळाटाळ करत आहेत, असे् म्हणत चाइल्डलाईन सदस्य तत्त्वशील कांबळे यांनी साम टीव्हीशी बोलताना तक्रारीचा पाढाचं वाचला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com