Mumbai News: धक्कादायक! नो एंट्रीत वाहन चालवल्याने डॉक्टरला मारहाण; ३ पोलिस निलंबित

या डॉक्टरचा एक नातेवाईक प्रशासनामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याने त्या अधिकाऱ्याने थेट मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली.
Samata Nagar Police
Samata Nagar Police Saamtv
Published On

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai Kandivali News: नो एन्टीत वाहन चालवल्यामुळे एका डॉक्टरला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. इतकेच नव्हेतर कारवाई होऊ नये यासाठी 25 हजार रुपये लाच म्हणून स्वीकारल्याचाही प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणात तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

Samata Nagar Police
Navi Mumbai News: अवघ्या 2 रुपयांसाठी मुलाने गमावला जीव; बिळातले पैसे काढायला गेला, अन् सापाने केला दंश

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईत मागील काही दिवसांपासून बेशिस्त वाहन चालकां विरोधात वाहतूक पोलिसांसोबतच मुंबई पोलिसांची (Mumbai Police) देखील कारवाई सुरू आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महापालिकेच्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने नो एन्ट्री वाहन चालवल्यामुळे त्याला देखील अशा कारवाईस सामोरे जावे लागले.

धक्कादायक बाब म्हणजे ही कारवाई करत असताना समता नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस अधिकारी आणि एक अंमलदार यांनी त्या डॉक्टरला कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेऊन धमकावले आणि मारहाण देखील केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हेतर कारवाई होऊ नये यासाठी त्या डॉक्टरकडून 25 हजार रुपये लाच म्हणून स्वीकारले. (Latest Marathi News)

Samata Nagar Police
Pune Accident News: नवले पुलावरील भय संपेना!; अपघातांचं सत्र सुरुच, आजही दोन अपघात

मात्र या डॉक्टरचा एक नातेवाईक प्रशासनामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याने त्या अधिकाऱ्याने थेट मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. ज्यानंतर या तीनही पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पो. उ नि.प्रफुल्ल मासळ आणि पो.ना.सचिन पाटील अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com