Satara Accident News Police car hit 4 people one died, three seriously injured Saam TV
महाराष्ट्र

Satara Accident News: भयंकर! पोलिसांच्या गाडीने ४ जणांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

संभाजी थोरात

Satara Police Accident News

भरधाव वेगात जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ४ जणांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सातारा जिल्ह्यातील कराड – ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. सुजल कांबळे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. गाडी चालवणाऱ्या पोलिसाने मद्यपान केलं असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, कराड – ढेबेवाडी (Satara Accident News) मार्गावर रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ४ तरुण रस्त्याच्या कडेला उभे राहून गप्पा मारत होते. त्याचवेळी कोळेवाडीकडून ढेबेवाडीकडे निघालेल्या भरधाव पोलीस गाडीने या तरुणांना जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले. मृत तरूण हा कोळेवाडीचा तर जखमी तरूण कुसूरमधील असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT