IND vs NZ: इतिहास बदलण्यासाठी टीम इंडिया उतरली होती मैदानात; या ५ कारणांमुळे झाला न्यूझीलंडचा गेम

IND vs NZ, World Cup 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ इतिहास बदलण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता.
World Cup 2023 IND vs NZ Match Highlights 5 Big Reason To team India Win Against New Zealand Match
World Cup 2023 IND vs NZ Match Highlights 5 Big Reason To team India Win Against New Zealand MatchSaam TV
Published On

India vs New Zealand Match Result

विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडमध्ये रविवारी अतिशय रंगतदार सामना झाला. चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढवणाऱ्या या सामन्यात अखेर टीम इंडियाने ४ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने इतिहास बदलला आहे.  (Latest Marathi News)

तब्बल २० वर्षांनंतर भारताने आयसीसीच्या स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत केलं आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ इतिहास बदलण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकात सर्वबाद २७३ धावा केल्या. न्यूझीलंकडून डॅरेन मिचेलने १३० धावांची शतकी खेळी केली. त्याला रचिन रविंद्रने चांगली साथ दिली. भारताकडून (Team India) मोहमद शमीने भेदक मारा करत ५ विकेट्स घेतल्या. त्याला मोहमद सिराज आणि जसप्रित बुमराहने चांगली साथ दिली. शेवटच्या १० षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडची फलंदाजी ढेपाळली.

टीम इंडियाच्या विजयाची ५ मोठी कारणे

१) भारताच्या वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना १९ धावात माघारी पाठवले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ सुरुवातीला बॅकफुटवर आला. रुचिन रविंद्रन आणि डॅरिल मिशेल यांनी केलेल्या विक्रमी दीडशतकी भागिदारीच्या जोरावर न्यूझीलंडने कमबॅक केले.

२) एकवेळ न्यूझीलंडचा संघ ३०० धावा करणार असं वाटत असताना मोहमद शमीने ऐन वेळेवर ही जोडी फोडली. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या १० षटकात फक्त ५७ धावा दिल्या. त्यामोबदल्यात न्यूझीलंडच्या ६ फलंदाजांना माघारी पाठवलं. भारताकडून मोहमद शमीने ५ विकेट्स घेतल्या.

World Cup 2023 IND vs NZ Match Highlights 5 Big Reason To team India Win Against New Zealand Match
Rashi Bhavishya: नोकरीचा योग येईल, मनातील इच्छा पूर्ण होईल; या राशींचं बदलणार भाग्य

३) कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोन्ही सलामीवीरांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून पावर प्लेमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे भारतीय संघाच्या मधल्या फळीवर दडपण आले नाही.

४) शुभमन गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. त्याने श्रेयस अय्यर आणि त्यानंतर केएल राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंडला या सामन्यावर पकड मिळवता आली नाही.

५) सूर्यकुमार यादव धावबाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रविंद्र जडेजाने विराट कोहलीची चांगली साथ दिली. एकवेळ हा सामना भारताच्या हातातून जाईल, असं वाटत असताना दोघांनी शेवटपर्यंत मैदानावर तंबू गाडत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

World Cup 2023 IND vs NZ Match Highlights 5 Big Reason To team India Win Against New Zealand Match
Rashi Bhavishya: नोकरीचा योग येईल, मनातील इच्छा पूर्ण होईल; या राशींचं बदलणार भाग्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com