Famous Singer Video
Famous Singersaam tv

Famous Singer : "तुझा रेट काय आहे?"; भर कार्यक्रमात प्रसिद्ध गायिकेला प्रश्न, तिने चप्पलेने दिला प्रसाद, पाहा VIDEO

Famous Singer Video : प्रसिद्ध गायिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती कार्यक्रमाच्या अँकरला चप्पलने मारायला जाताना दिसत आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Published on
Summary

प्रसिद्ध गायिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत गायिका कार्यक्रमाच्या अँकरला मारहाण करताना दिसत आहे.

गायिकेच्या सुरेल आवाजाचे लाखो प्रेक्षक दिवाने आहेत.

प्रसिद्ध गायिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत गायिका प्रचंड भडकलेली दिसत असून कार्यक्रमाच्या अँकरला मारण्यासाठी धावताना दिसत आहे. भोजपुरी गायिका निशा उपाध्याय कायम आपल्या गाण्यामुळे चर्चेत असते. मात्र आता ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका लाइव्ह स्टेज शो दरम्यान निशा भडकलेली दिसली. तिने अँकरला मारण्यासाठी थेट चप्पलच काढली.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, निशाच्या परफॉर्मन्स दरम्यान अँकरने गायिकेच्या फीबद्दल एक अश्लील टिप्पणी केली, ज्यामुळे गायिकेच्या रागाचा पारा चढला. अँकरने गायिकेला विचारले की, "आपका रेट क्या है?" हे ऐकताच गायिका भडकते, पायातील चप्पल काढते आणि अँकरला मारण्यासाठी धावते. स्टेजवरील इतर लोक गायिकेला थांबवतात.

निशा उपाध्यायचा व्हायरल व्हिडिओ सारण जिल्ह्यातील एका कार्यक्रमाचा आहे. व्हिडिओमध्ये लोक स्टेजवर जमलेली पाहायला मिळत आहेत. गायिका निशा उपाध्याय रागावलेली आणि हातात सँडल धरलेली दिसत आहे. ती अँकरला मारण्यासाठी धावते आणि तिच्यासोबत असलेले लोकही त्या प्रश्नाने संतापतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायर होत आहे. सोशल मीडियावर लोक निशाच्या कृतीचे कौतुक करत आहेत."महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे..." असे बोलत आहेत. भर कार्यक्रमात मानधनावरून गायिकेला प्रश्न केल्यामुळे हा सर्व प्रकार घडला.

निशा उपाध्याय कोण?

निशा उपाध्याय हे भोजपुरी संगीत जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. ती मूळची बिहारच्या सारण जिल्ह्यातील गौर बसंत गावची आहे. गायिका सध्या पटना येथे राहते. तिच्या दमदार आवाजाने आणि लोकगीतांच्या अनोख्या शैलीने तिने बिहार आणि देशभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या शोमध्ये अनेकदा हजारो लोकांची गर्दी होते.

Famous Singer Video
Rashmika-Vijay Wedding : गीता गोविंदमचं शाही लग्न! रश्मिका-विजयनं बुक केलं सर्वात महागडं हॉटेल, एका रात्रीचं भाडं वाचून थक्क व्हाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com