Singer Death: लोकप्रिय गायिका काळाच्या पडद्याआड; कार्यक्रमादरम्यान अचानक तब्येत खालावली, संगीत विश्वावर शोककळा

Singer Death: ओडिया संगीत विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव असलेल्या गीता पटनायक यांच्या निधन झाले आहे. गायिकेच्या अचानक झालेल्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.
Iconic Odia Singer Geeta Patnaik passes away
Iconic Odia Singer Geeta Patnaik passes awaySaam Tv
Published On

Singer Death: ओडिया संगीतातील लोकप्रिय गायिका गीता पटनायक यांचे कटक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कुटुंबातील सदस्याने सांगितले की, गेल्या आठवड्यात ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी संध्याकाळी वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

ब्रेन स्ट्रोकमुळे झाला मृत्यू...

गुरुवारी, एका कार्यक्रमात त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कटक येथील कॅपिटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर टेस्ट केल्यावर त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर गायिकेला कटक येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांचे मेहुणे प्रदोष पटनायक यांनी सांगितले की, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रविवारी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. त्यांनी पुढे सांगितले की, गायिकेचे पार्थिव सोमवार कटक येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

Iconic Odia Singer Geeta Patnaik passes away
Vijay Varma: तमन्ना भाटियासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा पुन्हा प्रेमात पडला? मिस्ट्री गर्लसोबतची पोस्ट पाहून चाहते थक्क

पाच दशकांहून अधिक काळ कारकिर्द

गीता पटनायक यांची कारकिर्द पाच दशकांहून अधिक काळ गाजली. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत असंख्य कलाकार आणि संगीतकारांसोबत काम केले. परंतु त्या प्रसिद्ध ओडिया गायिका अक्षया मोहंती यांच्यासोबतच्या सहकार्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय ओडिया गाण्यांना आवाज दिला, विशेषतः 'जजबर' चित्रपटातील 'फर किना उडिगला बाणी'.

Iconic Odia Singer Geeta Patnaik passes away
Actress Death Threat: बिग बॉस १३ फेम अभिनेत्रीला मिळाली धमकी; परदेशातील गुंडांनी केली १० कोटींची मागणी

मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त केला

गीता पटनायक यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांनी शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, "प्रसिद्ध गायिका गीता पटनायक यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे निधन ओडिशाच्या संगीत आणि संस्कृतीचे अपूरणीय नुकसान आहे. या दुःखाच्या वेळी, मी शोकग्रस्त कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी भगवान जगन्नाथाकडे प्रार्थना करतो." माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शोक व्यक्त केला आणि म्हटले की, "तिच्या मधुर आवाजाने ओडिया संगीत प्रत्येक घरात पोहोचवले आणि त्यांची गाणी नेहमीच लक्षात राहतील."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com