Bharat Jadhav
वाहतुकीच्या अनेक नियम आहेत. यातील काही नियम लोकांनीच तयार केली आहेत. तर काही शासनांनी असाच नियम म्हणजे सॅंण्डल किंवा स्लीपर घालून कार चालवण्याने दंड लागतो. चलान भरावे लागते. खरंच हा नियम आहे का, यात काही तथ्य आहे का?
काही वाहतूक पोलिस अधिकारी असा नियम असल्याचं म्हणतात. यामुळे जनतेमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण बरेच लोक चप्पलला असुरक्षित न मानता अनौपचारिक पादत्राणे असल्याचं म्हणतात.
पण वाहतूक नियमांनुसार चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड आकारला जात नाही. पायात बूट घालून वाहन चालवले किंवा चप्पल घालून चालवणे मोटार वाहन कायद्यात (Motor Vehicles Act) अशा प्रकारचा कोणताही नियम नाहीये.
चप्पल घालून वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा नाहीये. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने चप्पल घालून गाडी चालवणे चुकीचे नसल्याचं स्वत: वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय.
सुरक्षिततेच्या दृष्टीने तज्ज्ञ नेहमी योग्य बूट वापरण्याचा सल्ला देतात.
चप्पल किंवा सँण्डलच्या तुलनेत बूट पेडलवर अधिक चांगली पकड, स्थिरता आणि नियंत्रण देत असतात. अचानक ब्रेक मारण्याची किंवा वेग वाढवण्याची गरज भासल्यास पाय घसरण्याचा धोका कमी असतो.
योग्य बूट घातल्यास पेडलवर सतत आणि अचूक दाब ठेवता येतो, ज्यामुळे वाहनावर अधिक चांगले नियंत्रण राहते.
चप्पल सहज निसटू शकते, अडकू शकते किंवा घसरू शकते, ज्यामुळे वाहनावर नियंत्रण करण्यास विलंब होत असतो. अपघाताचा धोका वाढू शकतो.