Raigad Saam tv
महाराष्ट्र

Raigad: 'माझाही सरपंच देशमुख होण्याची वाट पाहताय?' रायगडच्या सरपंचाना जीवे मारण्याची धमकी

Raigad Sarpanch Fears for Life After Receiving Threats: रायगड जिल्ह्यात देशमुख हत्याकांडासारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण दिवेआगरमधील सरपंचाना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

सचिन कदम, साम टीव्ही

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या जखमा अजूनही राज्यातील जनतेच्या मनात ताज्या आहेत. अशातच रायगड जिल्ह्यात देशमुख हत्याकांडासारख्या प्रकाराची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याला कारणही तसेच धक्कादायक आहे. दिवेआगर ग्रामपंचायतीचे सरपंच सिद्धेश कोसबे यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई केल्यामुळे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे दिवेआगर गावात खळबळ उडाली आहे.

दिवेआगर समुद्रकिनाऱ्यालगतच्या शासकीय जागेवर चोगले कुटुंबाचे अनधिकृत घर आहे. हे अनधिकृत घर बांधल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे दाखल झाली होती. या तक्रारीची दखल घेत सरपंच कोसबे यांनी संबधितांना नोटीस पाठवली. नोटीस बजावल्यानंतर कोसबे कुटुंबासह सरपंचांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या घटनेनंतर कोसबे कुटुंब आणि सरपंचांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, या प्रकरणाकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सरपंच कोसबे यांनी केला आहे. 'आमचंही संतोष देशमुखासारखं काहीतरी होईपर्यंत वाट पाहताय का?' असा थेट सवाल त्यांनी प्रशासन आणि पोलिसांसमोर उपस्थित केला आहे.

निसर्गरम्‍य कोकणातील किनारपट्टीवरील मोक्‍याच्‍या जागांवर धनदांडग्‍यांचा डोळा आहे. त्‍या बळकावण्‍यासाठी स्‍थानिकांना हाताशी धरून दादागिरी केली जात असल्याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT