Walmik Karad  Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराडची परदेशात संपत्ती? मोबाइलमधील सिमकार्ड परदेशात रजिस्टर; तपासातून धक्कादायक माहिती उघड

Walmik Karad: संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडचे ३ मोबाइल आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत. यामधील एका मोबाइलमधील सिमकार्ड परदेशात रजिस्टर असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमूख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडकडून ३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यातील एक सिमकार्ड हे परदेशात रजिस्टर केलेले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळेच वाल्मीक कराडची परदेशात संपत्ती असल्याचा संशय सीआयडीला असून आता त्या दिशेने सीआयडीने तपास सुरू केला आहे.

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर बीडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या ठिकाणी जवळपास दीड तास युक्तीवाद झाला. या युक्तीवादादरम्यान सीआयडीने आरोपीची देशात तसेच परदेशात संपत्ती असून त्याचा शोध घ्यायचा असल्याचे सीआयडीने म्हटले होते.

सीआयडीच्या तपासातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराडकडून जप्त केलेल्या ३ मोबाईलपैकी एक मोबाईलधील सिमकार्ड हे परदेशात रजिस्टर केलेले आहे. त्यामुळे वाल्मीक कराडची परेदशात संपत्ती असल्याबाबतचा संशय बळावला आहे. आता सीआयडी या दिशेने तपास सुरु आहे.

दरम्यान वाल्मीक कराडला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकीलाकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता सीआयडीने या जामीन अर्जावर आक्षेप नोंदवला असून वाल्मीक कराडला जामीन मिळाला तर पुराव्यामध्ये छेडछाड होऊ शकतो? असा आक्षेप नोंदवत जामीन न देण्याची विनंती सीआयडीने न्यायालयाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

SCROLL FOR NEXT