
नितीन पाटणकर, साम प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर आलाय. वाल्मिक कराड १५० शेतकऱ्यांची फसवणूक करत त्यांच्याकडून ८-८ लाख रुपये उकाळले असल्याची बाब आता समोर आलीय. हार्वेस्टर मिळवून देतो म्हणत वाल्मिक कराडने शेतकऱ्यांना गंडा घातल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणाचा तपास करण्यात यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलीय.
सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला १४ दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आलीय. कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने त्याचे समर्थक आक्रमक झाले होते. अनेक ठिकाणी टायर जाळत आंदोलन केलं. कराडला जाणूनबुजून या प्रकरणात अडकवलं जात आहे, असा आरोप त्याचे समर्थक करत आहेत. तर वाल्मिक कराडला प्रकरणात अडकवण्यात येत आहे, असा आरोप कराडची पत्नी आणि त्याच्या आईने केलाय.
पण दुसऱ्या बाजुला वाल्मिक कराडचे नव नवीन प्रकरणं समोर येत आहेत. पुण्यातील काही शेतकऱ्यांनाही त्याने गंडा घातल्याची महिती समोर आलीय. पंढरपूरमधील काही शेतकऱ्यांकडून हार्वेस्टर मिळवून देण्याच्या नावाने पैसा उकाळला. पुणे भागातील जवळपास १५० शेतकऱ्यांना हार्वेस्टर घेऊन देण्याच्या नावाने वाल्मिक कराडने गंडा घातालय. प्रत्येक शेतकऱ्यांकडून ८-८ लाख रुपये घेतले. हार्वेस्टरचे अनुदान मिळवून देण्यासाठी त्याने १५० शेतकऱ्याकडून प्रत्येकी ८ लाख रुपये घेतल्याचा आरोप कराडवर करण्यात येत आहे.
दरम्यान याप्रकरणात परत एकदा धनंजय मुंडेंचे नाव येत आहे. धनंजय मुंडे कृषीमंत्री असतानाचा कराडकडून हा फसवणुकीचा गोरख धंदा केला जात अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणात आता शरद पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलीय.
सुप्रिया सुळे यांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हर्वेस्टर मालक रामचंद्र भोसले यांच्याशी सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली. त्यानंतर प्रकरणी त्यांनी पुणे ग्रामीण अधीक्षक पंकज देशमूख यांच्याशी फोनवर चर्चा केली. हार्वेस्टर मालकांची भेट पोलीस अधीक्षकांनी घ्यावी यासाठी सुप्रिया सुळे यांनी वेळ सुद्धा मागितलाय.
शेतकऱ्यांची अशा पद्धतीने फसवणूक होतेय हे खेदजनक आहे. त्यांचा अनुदान मिळवण्याचा हक्क आहे. माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे मी लक्ष घातले आहे. बारामती मतदार संघातील ४८ शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातील काही शेतकरी आहेत. खासदार अमोल कोल्हेंनी देखील यात लक्ष घातले असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.