Walmik Karad Property: गोपीनाथ मुंडेंचा घरगडी ते करोडपती; SITनंतर कराड ईडीच्या निशाण्यावर?

Walmik Karad On ED : गोपीनाथ मुंडेंचा घरगडी असलेल्या वाल्मिक कराडनं कोट्यवधींची माया कशी आणि कुठे जमवलीय....पाहूयात त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Walmik Karad
Walmik Karad PropertySaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

गोपीनाथ मुंडेंचा घरगडी ते करोडपती. हा प्रवास आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचा.कराडवर मकोका लागल्यानं तो सध्या सीआयडी कोठडीत आहे. कराडने आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी परळीत राखेच्या व्यवहाराचं कंत्राट, बीड, केज, परळीत वाईन शॉप एवढंच नाही तर दुसरी पत्नी ज्योती जाधव, आरोपी विष्णू चाटे यांच्यासह वॉचमन, ड्रायव्हर यांच्या नावावर रिएल इस्टेटमध्ये पाण्यासारखा पैसा गुंतवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय.

दरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानुसार कोणत्या शहरात कराडची किती मालमत्ता आहे? पाहूयात.

पुण्यातल्या फर्ग्युसन रोडसमोर 35 कोटी किंमतीचं शॉप

ज्योती कराड आणि विष्णू चाटेच्या नावावर अलिशान ऑफिस

मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावावर 75 कोटींचा इमारतीचा फ्लोअर

सुदाम नरोडेच्या नावे सिमरी पारगावमध्ये 50 एकर जमीन

ज्योती जाधव यांच्या नावावर बार्शी तालुक्यातील शेंद्रीत 50 एकर जमीन

मनिषा नरोडेंच्या नावावर सिमरी पारगावमध्ये 10-12 एकर जमीन

वॉचमन असलेल्या योगेश काकडेच्या नावावर 15-20 एकर जमीन

ज्योती जाधव यांच्या नावावर जामखेड तालुक्यातील दिघोळमध्ये 15-20 एकर जमीन

मंजिरी कराडच्या नावे पिंपरी-चिंचवडमध्ये दीड कोटी रूपये किंमतीचा फ्लॅट

बीड- 50 एकर, बार्शी 45 एकर, सोनपेठ 50 एकर जमीन

केज, परळी आणि बीडमध्ये 4-5 वाईन शॉप

Walmik Karad
Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठा निर्णय; न्यायालयीन चौकशी होणार

दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी फाट्याजवळ पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवरी इमारतीत कराड आणि त्याची पत्नी मंजली कराडच्या नावावर साडेतीन कोटींचा फ्लॅट असल्याचं समोर आलं होतं. मालमत्ता कर न भरल्याने कराडच्या या घरावर महापालिकेने नोटीस लावलीय. दुसरीकडे केज नगरपंचायतीनेही कराडच्या वाईन शॉपला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द केलंय.

Walmik Karad
Walmik Karad MCOCA : मुंडेंच्या मकोकात परळीचा आका, मालकाच्या कायद्यामुळे कराडचा करेक्ट कार्यक्रम, VIDEO

गोपीनाथ मुंडेंचा घरगडी म्हणून काम केलेल्या वाल्मिक कराडकडे अब्जावधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय. तर यापुर्वीच 2 फेब्रुवारी 2022 ला कराडला ईडीने नोटीस पाठवली होती. आता कराडबाबत नवे खुलासे समोर येत असल्याने ईडी कराडच्या संपत्तीवर टाच आणणार का? आणि सीआयडीसोबत ईडीही कराडची चौकशी करणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com