Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठा निर्णय; न्यायालयीन चौकशी होणार

Santosh Deshmukh Case Judicial Inquiry : मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची घोषणा दिली होती. आता चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
Santosh Deshmukh Case Judicial Inquiry
Santosh Deshmukh Case Judicial InquirySaam Tv
Published On

Santosh Deshmukh Case Updates : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी, हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात निवदेन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीसह न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे आश्वासन दिले होते. या संदर्भात सरकारकडून पुढील आदेश न निघाल्याने विरोधक सतत टीका करत होते. आता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे असणार आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी हत्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा, कागदपत्रे जप्त करण्याचा तसेच झडती घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सहा महिन्याच्या आत चौकशी समितीने हत्या प्रकरणावरील अहवाल राज्य सरकारकडे सादर करावयाचा आहे.

Santosh Deshmukh Case Judicial Inquiry
Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराडला ७ दिवस SIT कोठडी; कोर्टात काय घडलं? एसआयटीनं सांगितल्या ९ गोष्टी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींवर मकोका लावण्यात आला. याशिवाय खंडणी प्रकरणात अटक झालेल्या वाल्मीक कराडवरही मकोका लावला गेला आहे. न्यायालयाने कराडला सात दिवसांची एसआयडी कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर लगेच त्याला एसआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Santosh Deshmukh Case Judicial Inquiry
Walmik Karad : वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून जाळपोळ, घोषणाबाजी; दिवसभरात काय काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com