Walmik karad : परळीत राडा, कराड समर्थक आक्रमक, आत्महत्येचा इशारा, बीड पुन्हा तापले, आज काय काय झालं?

Walmik karad News : वाल्मिक करडचे समर्थक आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपासून परळीमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. केज न्यायालयात कराड यांचे वकील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलाय.
Walmik karad : वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक, टॉवरवर चढले, टायर पेटवले, परळीत तणाव वाढला
Walmik KaradSaam Tv
Published On

Parli Shuts Down as Valmik Karad's Supporters : वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर समर्थक आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपासून परळीमध्ये आंदोलन केले जात आहे. काही समर्थकांकडून रस्तारोकोही करण्यात आलाय. परळी आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आलाय. वाल्मिक कराड याच्या गावात एका तरूणाने आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण आणि समजकारण ढवळून निघालेय.

बीड जिल्ह्यातील गवाखेड्यात बंद -

परळी तालुक्यातील शिरसाळा, धर्मापुरी गाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिलीय. वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ धर्मापुरी आणि शिरसाळा गाव सकाळपासून बंद ठेवण्यात आले असून सर्व व्यवहार ठप्प करण्यात आहे. देशमुख हत्याप्रकरणाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जातिवाद करीत असून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना टार्गेट करत आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र विनाकारण कराड याला गोवले जात असून हे राजकारण थांबवले जावे. अशी मागणी या बंदच्या माध्यमातून केली जात आहे.

Walmik karad : वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक, टॉवरवर चढले, टायर पेटवले, परळीत तणाव वाढला
Walmik karad : वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक, टॉवरवर चढले, टायर पेटवले, परळीत तणाव वाढला

पोलीस अन् वकीलांमध्ये शाब्दिक चकमक -

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलाय. कराड याच्यावर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. मंगळवारी परळीमध्ये उग्र आंदोलन करण्यात आले. आजही परळी बंदची हाक देण्यात आली आहे. वाल्मिक कराड याचा ताबा घेण्यासाठी एसआयटीने कोर्टात धाव घेतली आहे. वाल्मिक कराड याला आज कोर्टात हजर करण्यात आले. पण त्याआधी कराड यांचे वकील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. केज न्यायालयाच्या गेटवर पोलीस अन् वकीलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांकडून बॅगाच्या तपासनीसह प्रत्येकाची तपासणी केली जात असल्याने शाब्दिक चकमक झाली.

Walmik karad : वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक, टॉवरवर चढले, टायर पेटवले, परळीत तणाव वाढला
Walmik Karad : कराड समर्थक आक्रमक, परळी कडकडीत बंद, आज वातावरण पुन्हा तापणार

कराडवरील गुन्हे मागे घ्या, समर्थकाची आत्महत्येचा इशारा

वाल्मिक कराड याच्यावर दाखल कऱण्यात आलेले गुन्हे खोटे आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे मागे घेण्यासाठी कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. परळी आणि आजूबाजूच्या ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात येतेय. वाल्मिक कराड याच्या गावात तरूणाने टॉवरवर चढत आंदोलन केलेय. तो मागील चार तासांपासून टॉवरवर चढून आंदोलन करत आहे. वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा आयुष्य संपवेल, असा इशारा त्याने सरकारला दिलाय. वाल्मिक कराड याच्या पांगरी गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.

Walmik karad : वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक, टॉवरवर चढले, टायर पेटवले, परळीत तणाव वाढला
Walmik karad : खोटा गुन्हा मागे घ्या, वाल्मीक कराडच्या ७५ वर्षीय आईनेच पोलिस ठाण्यासमोर मांडला ठिय्या

ओबीसी आक्रमक, बीड-सोलापूर महामार्ग रोखला

वाल्मिक कराडवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे असून तात्काळ मागे घेण्यात यावे, त्यासाठी बीडमधील ओबीसी आक्रमक झालाय. ओबीसी बांधवांनी बीड- सोलापूर महामार्ग अडवला. वडगाव फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला.

दुसरीकडे परळी शहरातही वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाले आहेत. मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आलेय. मारोती मुंडे या युवकाचे तीन तासापासून टॉवरवर चढून आंदोलन सुरू आहे. कराड याच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येचा इशारा देण्यात आलाय.

Walmik karad : वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक, टॉवरवर चढले, टायर पेटवले, परळीत तणाव वाढला
Parli Bandh : वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक, पाहा व्हिडीओ

धनंजय देशमुख काय म्हणाले ?

परळी येथे वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ होणाऱ्या आंदोलनाबाबत देशमुख कुटुंबिय किंवा आमचे गावकरी काही बोलणार नाहीत, असे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही न्याय मागतोय, आमची न्यायाची भूमिका कायम आहे. एसआयटी व सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट झाली, यात तपास योग्य दिशेने सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली, असे देशमुख म्हणाले.

हत्या प्रकरणातील जे काही पुरावे भेटले आहेत त्याच्या काही गोष्टी आम्हाला भेटाव्या अशी एसआयटीकडे मागणी केल्याचे देशमुख म्हणाले. मुख्यमंत्री यांची भेट घेवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व महाराष्ट्रात गुन्हेगारीला कुठेही थारा दिला जात नाही हे महाराष्ट्राला दाखवून देण्याची मागणी देशमुख यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com