Walmik karad : खोटा गुन्हा मागे घ्या, वाल्मीक कराडच्या ७५ वर्षीय आईनेच पोलिस ठाण्यासमोर मांडला ठिय्या

Santosh Deshmukh case Update : वाल्मीक कराड याच्यावरील खोटे गुन्हे लावण्यात आले, त्याच्यावर अन्याय होत आहे, असे म्हणत कराड याच्या आईने पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलेय.
Santosh Deshmukh case Update
Santosh Deshmukh case Update
Published On

Walmik karad news : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. वाल्मीक कराड याच्या आईने पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन केलेय. माझ्या मुलाला न्याय द्या... असे म्हणत वाल्मीक कराड याच्या आईने आंदोलन केलेय. वाल्मी कराड याच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे, राजकारणामुळे मुलावर अन्याय होत असल्याचे वाल्मीक कराडच्या आईने सांगितले.

माझ्या लेकरावर झालेला अन्याय दूर करा, त्याच्यावर दाखल झालेले सगळे गुन्हे खोटे आहेत, असे वाल्मीक कराड यांच्या आईने बोलताना सांगितले आहे. सुरेश धस,संदीप क्षीरसागर हे या प्रकरणात राजकारण करत असल्याचे देखील उपस्थित महिला सांगत आहेत.

आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराड याच्यासाठी त्याची आईने ठिय्या आंदोलन केलेय. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या आईने परळी पोलीस ठाण्यात ठिय्या सुरू केला आहे. वाल्मीक कराड याची पोलीस कोठडी आज संपत आहे, त्याला केज कोर्टासमोर आज हजर करणयात येणार आहे.

Santosh Deshmukh case Update
Walmik karad : धनंजय मुंडेंची शिफारस वादात, वाल्मिक कराड 'लाडकी बहीण'चा अध्यक्ष

दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या. माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या 75 वर्षीय पारुबाई बाबुराव कराड यांनी सकाळपासून परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला आहे.

Santosh Deshmukh case Update
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत, महिलेची कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

वाल्मीक कराडला कोर्टात सादर करणार?

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअप कोर्टात नेण्यात आले. केज न्यायालयात आज कराडला हजर करण्यात येणार आहे. केज न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. कोर्टात नेहण्याआधी वाल्मीक कराड याची मेडिकल तपासणी करण्यात आली. 14 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुढील सुनावणीसाठी वाल्मीक कराड याला केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com