Sanjay Raut News Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'देश वाऱ्यावर सोडून गल्लीबोळात फिरतायेत', PM मोदी- शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन संजय राऊतांचा घणाघात

Maharashtra Assembly Election 2024: ' उमेदवाराची क्षमता काय? पक्षाची ताकद याच्यावर प्रत्येक मतदारसंघानुसार चर्चा होईल थोडा वेळ लागतो',असं संजय राऊत म्हणाले.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. ३ ऑक्टोबर

Sanjay Raut On MVA Seat Sharing Formula: महाविकास आघाडीमधील तीन पक्षांचा घटक पक्षांची संपूर्ण चर्चा पूर्ण होईल त्यानंतर कोण कुठे लढत आहे हे समजेल. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढत आहोत, आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबर गद्दार पक्षाचा पराभव करायचा आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मविआच्या जागा वाटपाबाबत महत्वाचे विधान केले. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

'महाविकास आघाडीमधील तीन पक्षांचा घटक पक्षांची संपूर्ण चर्चा पूर्ण होईल त्यानंतर कोण कुठे लढत आहे समजेल. आम्ही आकडे घेऊन बोलत नाही. आम्ही सगळेमहाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढत आहोत. लोकसभेला तेच सूत्र होते विधानसभेला तेच सूत्र असणार. उमेदवाराची क्षमता काय? पक्षाची ताकद याच्यावर प्रत्येक मतदारसंघानुसार चर्चा होईल थोडा वेळ लागतो. आकड्यांवर वर गेलो असतो तर हा तासाभरातला खेळ आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबर गद्दार पक्षाचा पराभव करायचा आहे,' असं संजय राऊत म्हणाले.

'देशाचे गृहमंत्री राज्यात येऊन बसले आहेत प्रधानमंत्री ठाण्यामध्ये येत आहेत. आज घोडबंदर, उद्या घांटाळी परवा पाचपाखाडी नंतर नौपाडा. ते प्रधानमंत्री आहेत त्यांनी प्रधानमंत्री सारखे वागायला पाहिजे. सरदार पटेल जागा वाटपायला महाराष्ट्रात येऊन बसायचे का? सरदार पटेल महात्मा गांधी राज्यात एकच सभा घ्यायचे आमचे जे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री आहेत ते देश वाऱ्यावर सोडून गल्ली बोळात फिरत आहेत. एकाच मेट्रोचे सहा वेळा उद्घाटन करत आहेत,' असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला.

"भारतीय जनता पक्षाला असं वाटत आहे कायदा त्यांच्या घरात भांडी घासतो. दोन महिन्यात कायद्याचं राज्य काय असतं ते कळेल. आमच्या लोकांवर हल्ले होत आहेत. त्यांच्यावर प्रतिहल्ले करण्याची ताकद नक्कीच आमच्यात आहे. राज्य पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या कोलमडून गेले आहे," असे म्हणत राऊतांनी राज्यातील गुन्हेगारी घटनांवरुनही महायुतीवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paranda Fort History: दारूगोळ्याचे भांडार अन् स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना, परंडा किल्ल्याचा इतिहास वाचा

Box office collection: 'कंतारा १' ने पार केला ५०० कोटींचा टप्पा; 'सनी संस्कार...'च्या कमाईत घट, कलेक्शनचा आकडा किती?

Singada Benefits : शिंगाडे संजीवनीपेक्षा कमी नाही; ५ फायदे वाचून व्हाल चकीत, आजच आहारात करा समावेश

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल

SCROLL FOR NEXT