Maharashtra Politics: भाजपचं मिशन महाराष्ट्र! केंद्रीय मंत्र्यांच्या टीमकडून पुण्यात सर्व्हे ; नाशिकमध्ये गुप्त मतदान, पडद्यामागे काय घडतयं?

Maharashtra Politics Latest News: एका केंद्रीय मंत्र्याने नियुक्त केलेलं एक पथक पुण्यात तळ ठोकून असून भाजपच्या अतिवरीष्ठ नेत्याकडून पुण्यात सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra Politics: भाजपचं मिशन महाराष्ट्र! केंद्रीय मंत्र्यांच्या टीमकडून पुण्यात सर्वे; विद्यमान आमदारांची धाकधुक वाढली?
Devendra Fadnavis and Amit ShahThe week
Published On

अक्षय बडवे, पुणे|ता. २ ऑक्टोबर

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला अवघे काही दिवस राहिलेत. विधानसभेच्या निवडणुकांची भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात तळ ठोकला असताना दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय समितीचेही महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बारीक लक्ष असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: भाजपचं मिशन महाराष्ट्र! केंद्रीय मंत्र्यांच्या टीमकडून पुण्यात सर्वे; विद्यमान आमदारांची धाकधुक वाढली?
Chandrakant Patil News: 'म्हणून अमित शहांना आपण दररोज नमस्कार केला पाहिजे', चंद्रकात पाटलांचे विधान चर्चेत; नेमकं काय म्हणाले?

भाजपचे मिशन महाराष्ट्र!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे दौरे वाढलेले दिसत असतानाच भाजपच्या केंद्रीय समितीचेही महाराष्ट्राच्या निवडणुकीवर लक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. एका केंद्रीय मंत्र्याने नियुक्त केलेलं एक पथक पुण्यात तळ ठोकून असून भाजपच्या अतीवरिष्ठ नेत्याकडून पुण्यात सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्यामध्ये गुप्त सर्वेक्षण

पुण्यातील सर्व ८ विधानसभा मतदारसंघात गोपनीय सर्वेक्षण सुरू असून पुण्यातील विद्यमान आमदार यांच्या मतदारसंघासह इतर ठिकाणी सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल थेट केंद्रात पाठवला जाणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे निवडणूक प्रभारी यांच्यापर्यंत हा अहवाल पोहोचवला जाणार आहे. उमेदवार निश्चित करण्यासाठी हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या अहवालातून वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेली नावं, पक्षाच्या पातळीवर करण्यात आलेले सर्वेक्षण, इलेक्टिव मेरिट वर तिकीट जाहीर होणार आहे.

Maharashtra Politics: भाजपचं मिशन महाराष्ट्र! केंद्रीय मंत्र्यांच्या टीमकडून पुण्यात सर्वे; विद्यमान आमदारांची धाकधुक वाढली?
Maharashtra Politics: माढ्यात नवा राजकीय तिढा! मोहिते पाटलांचे पुतणे विधानसभेच्या रिंगणात; उमेदवारीवरुन 'मविआ'त वादंग?

नाशिकमध्ये गुप्त मतदान..

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यांतील विधानसभेच्या जागांसाठीही भाजपने मायक्रो प्लॅनिंग केले आहे. भाजपने नाशिकच्या प्रत्येक मतदारसंघात गुजरातच्या स्पेशल टीम सोबतच निरीक्षकांची फौज मैदानात उतरवली आहे. यामधून यंदा पहिल्यांदाच उमेदवार निवडीसाठी प्रत्येक मतदारसंघात गुप्त मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मदारसंघात तब्बल ७०० भाजप पदाधिकाऱ्यांनी उमेदवार निवडीसाठी गुप्त मतदान केल्याचे सांगण्यात येत असून भाजपच्या नव्या प्रक्रियेमुळे विद्यमान आमदारांची धाकधूक चांगलीच वाढवली आहे.

Maharashtra Politics: भाजपचं मिशन महाराष्ट्र! केंद्रीय मंत्र्यांच्या टीमकडून पुण्यात सर्वे; विद्यमान आमदारांची धाकधुक वाढली?
Crime News : आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार; पोलिसांच्या तपासात निष्काळजीपणा, हायकोर्ट संतापलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com