Pune Bjp Crisis: विधानसभेच्या तिकिटावरून पुण्यात भाजपचे नेते भिडले, बैठकीमध्ये तुफान राडा

Maharashtra Assembly Election 2024: खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. प्रसन्न जगताप आणि दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून वाद झाला.
Pune Bjp Crisis: विधानसभेच्या तिकिटावरून पुण्यात भाजपचे नेते भिडले, बैठकीमध्ये तुफान राडा
Maharashtra Assembly Election 2024Saam Tv
Published On

सागर आव्हाड, पुणे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीसाठी भाजपकडून राबवण्यात आलेली एमपी पॅटर्न आधारित निवडणूक प्रक्रिया चांगली चर्चेत आली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रस्थापितांनी नव्याने निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुकांची नाकेबंदी केल्याचं चित्र समोर आले आहे. त्यासोबतच या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार आणि आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या राज्यभर राबविण्यात येत आहे. मात्र ही प्रक्रिया भाजपच्या अंतर्गत गटबाजी आणि शहकाटक्षाच्या राजकारणाने चर्चेत आली आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास भाजपकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्यासोबतच माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, दिलीप वेडे पाटील आणि दीपक नागपुरे यांचे नाव चर्चेत आहे. यापैकी एक नाव आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी निश्चित होऊ शकतं मात्र तत्पूर्वी मंगळवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत आमदार भीमराव तापकीर त्याचबरोबर इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप भाजप नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी आल्याची माहिती समोर आली आहे. भाषणाच्या मुद्द्यावरून इच्छुक उमेदवार आणि आमदारांच्या बाचाबाची झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Pune Bjp Crisis: विधानसभेच्या तिकिटावरून पुण्यात भाजपचे नेते भिडले, बैठकीमध्ये तुफान राडा
Maharashtra Politics: माढ्यात नवा राजकीय तिढा! मोहिते पाटलांचे पुतणे विधानसभेच्या रिंगणात; उमेदवारीवरुन 'मविआ'त वादंग?

आमदार भीमराव तापकीर यांनी कोणालाच न बोलून देण्याचा आरोप भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी केला आहे. हा सर्व प्रकार भाजपचे केंद्रातून आलेले निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर आला असून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील दोन इच्छुकांचे गट आमने-सामने ठाकले असल्याचं पाहायला मिळालं. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकीर हे तीनदा आमदार झाले आहेत. आता चौथ्यांदा देखील ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

Pune Bjp Crisis: विधानसभेच्या तिकिटावरून पुण्यात भाजपचे नेते भिडले, बैठकीमध्ये तुफान राडा
Maharashtra Politics: पुण्यात अजित पवारांची वाट खडतर? चेतन तुपे आणि सुनील टिंगरेंनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याला मारली दांडी

मागील निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांनी त्यांचा विजय झाला होता. यामुळे यंदा त्यांच्याबाबत मतदारसंघांमध्ये अँटिकंबनसी असल्याचं इतर इच्छुक सांगत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी करत आहेत आणि हाच वादाचा मुद्दा ठरला आहे. याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमदार भीमराव तापकीर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 'मी जे सर्वे केले आहेत त्या सर्वेमध्ये मीच पुणे जिल्ह्यात मताधिक्याने निवडून येईल असे सर्वेत आहे. आम्ही इच्छुक असून आम्हाला बोलू का दिले नाही यासंदर्भात आम्ही वरिष्ठांशी तक्रारी केल्या आहेत.' अशी माहिती प्रसन्न जगताप यांनी दिली.

Pune Bjp Crisis: विधानसभेच्या तिकिटावरून पुण्यात भाजपचे नेते भिडले, बैठकीमध्ये तुफान राडा
Maharashtra Politics: 'राज्यात महायुतीचेच सरकार आणू..' CM शिंदेंची ग्वाही, अमित शहांकडे केली मोठी विनंती; बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com