Madha Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभेचे जागा वाटप तसेच उमेदवारीवरुन राजकीय पक्षांमध्ये कुरघोडी पाहायला मिळत आहे. अशातच माढा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. माढ्यामध्ये शिवतेज मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची मागणी पुढे आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहेत. काल संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात उमेदवारीची मागणी केली आहे. त्यानंतर आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे शिवतेज मोहिते पाटील यांना ही माढ्यातून उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राम मस्के यांनी केली आहे. मस्के यांच्या मागणी नंतर आता माढ्यात उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे.
शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काल टेंभुर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा झाला. या मेळाव्यात आमदार बबनराव शिंदे यांना उमेदवारी देण्यास विरोध केला. याच वेळी संजय कोकाटे यांनी उमेदवारी माढा तालुक्यातील भूमिपत्राला द्यावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर आज शिवतेज मोहिते पाटील मोहिते पाटील समर्थकांनी शिवतेज मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.
दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी आमदार बबन शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी मेळावा घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या मेळाव्यात मीनल साठे,शिवाजी कांबळे, संजय घाटणेकर यांनी ही उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे माढ्यात उमेदवारीचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.