Paithan News: 'मला पाणी पाहायचंय', डॉक्टर महिलेची ६ महिन्याच्या बाळासह गोदावरी नदीत उडी; मन सुन्न करणारी घटना

Women Doctor Death Paithan News: नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडला असून ६ महिन्याच्या बाळाचा शोध अद्याप लागलेला नाही. आईने चिमुकल्या बाळासोबत नदीत उडी घेऊन आयुष्य संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Paithan News: 'मला पाणी पाहायचंय',  डॉक्टर महिलेची ६ महिन्याच्या बाळासह गोदावरी नदीत उडी; मन सुन्न करणारी घटना
Women Doctor Death Paithan News:Saamtv
Published On

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. २ ऑक्टोंबर

Chhatrapati Sambhajinagar News: महिला डॉक्टरने 6 महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडली. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये घडलेल्या या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी शोध मोहिम राबवली. 2 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर महिलेचा मृतदेह सापडला असून 6 महिन्याच्या चिमुकल्याचा अद्यापही शोध लागला नाही.

Paithan News: 'मला पाणी पाहायचंय',  डॉक्टर महिलेची ६ महिन्याच्या बाळासह गोदावरी नदीत उडी; मन सुन्न करणारी घटना
Maharshtra politics : विधानसभा निवडणुकीआधीच निकालाबाबत मोठी भविष्यवाणी, जयंत पाटील यांनी आकडाच सांगितला!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिला डॉक्टरने 6 महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडली. पूजा प्रभाकर व्हरकटे असे या आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडला असून ६ महिन्याच्या बाळाचा शोध अद्याप लागलेला नाही. आईने चिमुकल्या बाळासोबत नदीत उडी घेऊन आयुष्य संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ऑटो रिक्षात बसून पैठण शहरातून एका खेड्या गावात जायचे आहे, असं सांगून डॉक्टर पूजा प्रभाकर व्हरकटे या आपल्या बाळासोबत रिक्षामध्ये बसल्या होत्या. पूल आल्यानंतर रिक्षा चालकाला "मला गोदावरी नदीचे पाणी पाहायचे आहे" असे म्हणत रिक्षा थांबवली आणि काही क्षणातच आपल्या चिमुकल्या बाळासह गोदावरी नदी पात्रात पुलावरून उडी घेतली.

Paithan News: 'मला पाणी पाहायचंय',  डॉक्टर महिलेची ६ महिन्याच्या बाळासह गोदावरी नदीत उडी; मन सुन्न करणारी घटना
Crime News : १ लाखाच्या मोबाइलसाठी डिलिव्हरी बॉयचा काटा काढला, घरात बोलवून संपवलं, त्यानंतर जे केलं ते वाचून डोक्याला हात लावाल

याबाबत रिक्षा चालकाने तात्काळ बचाव पथक तसेच पोलिसांना माहिती दिली. 2 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर 15 ते 20 मच्छीमारांच्या मदतीने या महिलेचा मृतदेह सापडला परंतु चिमुकल्या बाळाचा मात्र शोध लागला नाही. दरम्यान, उच्चशिक्षित डॉक्टर महिलेने आपल्या पोटच्या मुलाला घेऊन इतका टोकाचा निर्णय का घेतला? याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Paithan News: 'मला पाणी पाहायचंय',  डॉक्टर महिलेची ६ महिन्याच्या बाळासह गोदावरी नदीत उडी; मन सुन्न करणारी घटना
Bus Accident: बस- ट्रॅक्टरचा अपघात; चालकाचा मृत्यू, प्रवाशी जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com