Devendra Fadnavis | Sanjay Raut  SaamTvNews
महाराष्ट्र

Sanjay Raut: छत्रपती शिवरायांनी सूरत दोनदा लुटली, फडणवीसांनी इतिहास वाचावा; संजय राऊतांचा सल्ला

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई, ता. २ सप्टेंबर २०२४

Sanjay Raut On Chhatrapati Shivaji Maharaj History: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने काल राज्यभर सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन केले. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे राजकीय आंदोलन असून काँग्रेसने आजपर्यंत महाराजांनी सुरत लुटल्याच्या घटनेचा चुकीचा इतिहास शिकवला, अशी टीका केली होती. फडणवीसांच्या या टीकेचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला असून इतिहास वाचण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही हा तुमचा नवीन चिंतनाचा विषय समोर आणला आहे. तुम्हाला इतिहास काय माहिती? तुम्ही कधी इतिहास शिकला? म्हणजे तुम्ही शत्रू आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटली. शिवाजी महाराजांनी सुरत राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी लुटली. ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते प्रोटेक्शन मनी देत होते. हा राष्ट्रद्रोह आहे. त्यामुळेच त्यांनी ठरवलं ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची आहे तर सुरत लुटावी लागेल. या व्यापाऱ्यांना धडा शिकवावे लागेल. हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा. नाहीतर आम्ही त्यांना इतिहासाचा मास्तर पाठवू," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पेशवाईचे उत्तराधिकारी फडणवीस...

"ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथ यांनी पुण्यात शिवाजी महाराज यांचे मराठा साम्राज्य लयास नेले, पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. पेशवाईचे उत्तर अधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत. त्याशिवाय अशी भाषा त्यांनी केली नसती. देवेंद्र फडणवीस कोणता इतिहास आम्हाला सांगत आहेत? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी आम्ही लढत आहोत. आम्ही संघर्ष करत आहोत आणि तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करता. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्यास विरोध करता?" असा सवालही राऊतांनी केला.

आम्हाला इतिहास शिकवणार का?

"मालवणमध्ये शिवाजी महाराज पुतळा तोडला हे तुमचे पाप आहे. त्यात कोट्यावधीच्या घोटाळा करणारे आज ही मोकाट आहेत तुम्ही त्यांना अटक करू शकत नाही. कारण ते तुमच्या पेशवाईचे शिलेदार आहेत. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्वाखाली जयंत पाटलांसोबत अन्य लोक होते. तेव्हा मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचे काम हे भाजपचे गुंड करत होते तुम्ही त्यांचे समर्थक आहात. हे गुंड आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणार आहात का?" असे राऊत म्हणाले.

शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही...

तसेच "तुम्हाला शिवाजी महाराजांचा नाव घेण्याचा अधिकार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारी तुम्ही आहात. आपण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणार तोपर्यंत लग्न करणार नाही ही घोषणा कोणाची होती. तुम्ही शिवाजी महाराजांचे सच्चे भक्त असाल तर बेळगाव कारवार यावर तुमची काय भूमिका आहे स्पष्ट करा. शिवाजी महाराजांचा राज्य मावळ्यांचे राज्य होतं. तुम्ही हे खतम करायला निघाले आहात," असा घणाघातही राऊतांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT