Rajkot Fort : छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली नव्हती, केवळ...; इतिहास सांगत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे-पवारांना घेरले!

Uddhav Thackeray marathi : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
uddhav thackeray and devendra fadnavis
uddhav thackeray and devendra fadnavis Saam tv
Published On

Devendra Fadnavis : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेय. या घटनेचा निषेध म्हणून रविवारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रभर जोडो मारो आंदोलन करण्यात आले. मविआच्या आंदोलनाला भाजपकडूनही प्रत्युत्तर देत राज्यभर आंदोलन पुकारले. मविआने मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत पायी मोर्चा काढला. गेटवे ऑफ इंडिया येथील शिवपुतळा स्थानी जोडे मारो आंदोलन केले. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमाला दाखल झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाबद्दल फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्नाटक आणि मध्यप्रदेशमधील घटना सांगत ठाकरे आणि पवार यांना त्यांनी उलट सवाल केलाय.

uddhav thackeray and devendra fadnavis
MVA Protest News: मालवण घटनेविरोधात मविआचा एल्गार! शरद पवार, उद्धव ठाकरे रस्त्यावर, राज्यभर 'जोडे मारो' आंदोलन; VIDEO

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहलं आहे, त्यासंदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उपस्थित केला.

काँग्रेसने मध्यप्रदेश मध्ये ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझर लावून तोडला त्यावरती शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब मूग गिळून का बसले आहेत?

कर्नाटकमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला, यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवरायांचा पुतळा का हटवला? याबद्दल ते का बोलत नाहीत.

काँग्रेसने आम्हाला इतिहासात काय शिकवलं, तर शिवाजी महाराजांनी सूरत लुटली . पण सुरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता, आक्रमण केलं होतं.

आशाप्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतकी वर्ष शिकवला, त्याला माफी मागायला सांगणार का? केवळ खुर्चीसाठी त्यांचा मिंधेपणा स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये देवेंद्र फडणवीस -

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वस्तीगृहाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा विधी आणि न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला. मुलींच्या वसतिगृहाच्या कोनशिला समारंभ माझ्याच काळात झाली व या इमारतीचे उद्घाटन मीच करत आहे, राजकारण्यांच्या आयुष्यात हा दुर्मिळ योगायोगाचा मी साक्षीदार असल्याचे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. विरोधक सरकारवर टीका करताना आपल्या देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र नाहीत, असं खोट नकारात्मक चित्र रंगवतात. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक सशक्त संविधान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com