raju shetti has no interest in mahayuti and mahavikas aghadi  saam Tv
महाराष्ट्र

Raju Shetti News: मोठी बातमी! स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींसह १५० जणांवर गुन्हा; काय आहे प्रकरण?

Raju Shetti News: सांगली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह तब्बल १५० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Satish Daud

Police Case Registered Against Raju Shetty

सांगली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह तब्बल १५० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्यावर आंदोलन करत तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजू शेट्टी यांच्यासह १५० जणांवर तोडफोडीचा तसेच लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अगदी दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी ऊसदराच्या मागणीसाठी जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्यावर आंदोलन केलं होतं.

वजन काट्याच्या समोरील मोकळ्या जागेत आपल्या राजू शेट्टी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह ठाण मांडून होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कारखाना १० तास बंद पाडून नुकसान केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

आंदोलनाच्या १० तासांच्या काळात कारखान्याचे आर्थिक नुकसान व्हावे, या उद्देशाने गाळप बंद पाडले. ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार तसेच कारखान्याचे साखर, इथेनॉल उत्पादन, डिस्टिलरी व को-जनरेशन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान केले, असा आरोप राजू शेट्टी यांच्यावर करण्यात आला आहे.

याप्रकरणी कारखान्याचे सचिव दिलीप महादेव पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून राजू शेट्टी, भागवत जाधव, महेश खराडे, संदीप राजोबा, अॅड. शमशुद्दीन संदे, रविकिरण माने, संतोष शेळके, राजेंद्र माने, स्वास्तिक पाटील, सूर्यकांत मोरे, काशीनाथ निंबाळकर, प्रभाकर पाटील यांच्यासह १५० जणांवर इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जनसुरक्षा विधेयकाविरोधात शिवाजी पार्कात आंदोलन

Petrol Diesel :...तर तुम्हाला पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

SCROLL FOR NEXT