Sangli District Bank Saam tv
महाराष्ट्र

Sangli District Bank : सांगली जिल्हा बँकेची बड्या कर्जदारांवर नजर; नऊ संस्थांकडून १३० कोटीची कर्ज वसुली

Sangli News : जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांना शेती कर्ज वाटप करण्यात येत असते. या सोबतच बिगर शेती कर्ज देण्यात येते. कर्ज वाटप केल्यानंतर कर्जदार बऱ्याचदा कर्ज भरणा न करता थकवतात

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या वर्षभरात बड्या बिगर शेती थकित कर्जदारावर कारवाईचा बडगा उगारला आहे. यात थकबाकीदार नऊ संस्थांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल १३० कोटी ४७ लाख रुपयांची कर्ज वसुली केली आहे. या सर्व संस्था एनपीए मधील आहेत. तर मार्च 25 पर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांना शेती कर्ज वाटप करण्यात येत असते. या सोबतच बिगर शेती कर्ज देखील देण्यात येत असते. कर्ज वाटप केल्यानंतर कर्जदार बऱ्याचदा कर्ज भरणा न करता थकवत असतात. यामुळे थकीत रक्कम वाढत असते. त्यानुसार सांगली जिल्हा बँकेकडून देखील कर्ज देण्यात आले. आता बँकेच्या कर्ज थकविणाऱ्यांकडून वसुली करण्यात येत आहे. मार्च एंडिंगपर्यंत हि वसुली चालणार आहे. 

बड्या कर्जदारांवर नजर 
दरम्यान शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने कारवाई केल्यास त्याला काही संघटना आणि पुढाऱ्यांकडून विरोध होतो. बड्या कर्जदारांची वसुली बँक करत नसल्याचा आरोप सातत्याने केला जातो. मात्र बँकेने गेल्या काही वर्षात बड्या कर्जदाराकडील थकबाकीला प्राधान्य दिले असून अनेक संस्थांवर सरफेसी ऍक्ट अंतर्गत कारवाई करून त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. काही थकबाकीदार संस्थांच्या लिलाव ही केला आहे. 

मार्चपर्यंत १०० कोटींची होणार वसुली 

कर्ज घेतलेल्या बड्या संस्थाकडे कर्ज वसुलीसाठी बँक सातत्याने कायदेशीर मार्गाने तसेच संबंधित संचालकांशी चर्चा करून तडजोडने वसुलीसाठी प्रयत्न करत आहे. यासाठी शेतकऱ्यांबरोबरच बिगर शेती थकबाकीदार संस्थांसाठी बँकेने ओटीएस योजना लागू केली आहे. या अंतर्गत आता पर्यंत १३० कोटी ४७ लाख रुपयांची कर्ज वसुली झाली आहे. तर मार्चअखेर आणखी १०० कोटी वसुली होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

Shukra Gochar 2025: 'या' ३ राशींना होणार भलं; नोकरीत बढती आणि व्यवसायत होईल भरभराट

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची रिमझिम सुरूच! कोकणासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

SCROLL FOR NEXT