Narmada Parikrama : भारतीय संस्कृतीने प्रेरित होऊन नर्मदा परिक्रमा; अमेरिकन नौदलाचे निवृत्त अधिकाऱ्याचा रोज ३० किमीचा पायी प्रवास

Nandurbar News : थॉमस यांना नर्मदा परिक्रमेचे महत्त्व आणि भारतीय परंपरेशी त्याचा संबंध समजावून सांगितला. नर्मदा परिक्रमेचा अनुभव केवळ अध्यात्मिक शांती देत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन
Narmada Parikrama
Narmada ParikramaSaam tv
Published On

सागर निकवाडे
नंदूरबार
 : भारतीय हिंदू संस्कृती आणि अध्यात्म्याची भुरळ आता सातासमुद्रापार राहणाऱ्या अमेरिकन नौदलातील निवृत्त अधिकारी असलेले ७२ वर्षीय थॉमस कटाणा यांना लागली आहे. सर्वात खडतर डोंगर रांगातून नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर केल्या जाणाऱ्या नर्मदा परिक्रमा ते करत आहेत. भारतीय संस्कृती आणि आध्यात्माने प्रेरित होऊन त्यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी अमरकंटक येथून या यात्रेला सुरुवात केली आहे.

नर्मदा परिक्रमा करताना थॉमस दररोज सरासरी ३० किलोमीटर प्रवास करतात. तर आठवड्यातून एक दिवस विश्रांती घेऊन ते चिंतन आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करतात. आतापर्यंत ४१ दिवसांचा प्रवास त्यांचा झाला आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी भारतीय साध्या जीवनशैलीचा स्वीकार केला आहे.

Narmada Parikrama
Shivsena Political News : शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; पालघरमधील ४ नगरसेवक तर लातूरचे माजी जिल्हाप्रमुख शिंदे गटात

दिल्ली येथील गुरुबहीणीचे मार्गदर्शन

थॉमस यांना त्यांच्या गुरुबहीण दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापिका डॉ. अल्का त्यागी यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ते देखील त्यांच्या सोबत परिक्रमा करत आहे. त्यांनीच थॉमस यांना नर्मदा परिक्रमेचे महत्त्व आणि भारतीय परंपरेशी त्याचा संबंध समजावून सांगितला. नर्मदा परिक्रमेचा अनुभव केवळ अध्यात्मिक शांती देत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतो. भारतीय संस्कृती ही एक प्रेरणादायक परंपरा आहे," असे थॉमस यांनी सांगितले.

Narmada Parikrama
Wakad Police : टपरी चालकाकडून ५ किलो गांजा जप्त; थर्टी फर्स्टच्या रात्री वाकड पोलिसांची कारवाई

नर्मदा यात्रेत करताय वृक्षारोपण 

थॉमस यांचा हा प्रवास केवळ शारीरिक साहस नसून तो मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक अनोखा प्रयोग आहे. या प्रवास दरम्यान स्थानिक लोकांशी संवाद साधत त्यांच्या जीवनशैलीचा अनुभव घेत त्यांनी भारतीय परंपरेचा आदर दर्शवला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी अमेरिकेतून आलेले गृहस्थ नर्मदा यात्रेत चालत वृक्षारोपण करत आहेत. त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत समाजात जागरूकता निर्माण केली. सरसकट वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखता येतो आणि पुढील पिढ्यांसाठी हरित भविष्य घडवता येते. असे त्यांचे म्हणणे आहे.

थॉमस यांचा हा प्रयत्न जागतिक स्तरावर भारतीय परंपरेचा सन्मान वाढवणारा ठरला आहे. त्यांच्या या प्रवासाचे कौतुक करत अनेक स्थानिकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. थॉमस कटाणा यांची नर्मदा परिक्रमा केवळ भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत नाही, तर जागतिक पातळीवर मानवतेच्या एकात्मतेचा संदेश देत आहे. थामस एलवर्ट कटाना व डॉ. अल्का त्यागी यांच्या सोबत लालाराम चक्रवर्ती, सुधीर अग्रवाल, विनोद नेगी, भगवंत सिंह राणा, गुल भाई, दीपक यादव आदी जण यात्रा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com