Sangli Crime Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Crime: धावत्या शिवशाहीमध्ये तरुणीसोबत भयंकर घडलं, सांगली स्थानकात उतरताच रडू लागली, पोलिसांची नजर पडली अन्...

Sangli Police: पुण्यातून सांगलीकडे एक तरुणी शिवशाही बसमधून जात होती. आष्टानजीक वैभव कांबळे या तरुणाने तरुणीची छेड काढून तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

विजय पाटील, सांगली

पुण्यातल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवरील बलात्काराची घटना ताजी असताना सांगलीमध्ये धावत्या शिवशाहीमध्ये तरूणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यामध्ये संशयित तरूणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. वैभव कांबळे असे या संशयित तरुणाचं नाव आहे.

पुण्यातून सांगलीकडे एक तरुणी शिवशाही बसमधून जात होती. आष्टानजीक वैभव कांबळे या तरुणाने तरुणीची छेड काढून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर सदर तरुणी ही भयभीत झाली होती. मात्र सांगली बस स्थानकावर बस पोहचताच तरुणीने सदरचा प्रकार चालक आणि वाहकांना सांगितला. दरम्यान संशयित वैभव कांबळे यांने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता प्रवाशांनी त्याचा पाठलाग करत त्याला चोप देऊन शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.

६ मार्चला मध्यरात्री १२ च्या सुमारास बस स्थानकावर एक तरुणी रडत थांबल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या तरुणीला विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी संबंधित तरुणाला तात्काळ ताब्यात घेतलं. या प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यामध्ये वैभव कांबळेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT