Shambhuraj Desai MP Sanjay Kaka Patil  Saamtv
महाराष्ट्र

Sangli News: कोयनेच्या पाण्यावरुन राजकारण तापले! खासदार संजय काका पाटील राजीनामा देणार? शंभूराज देसाईंना इशारा

Koyana Dam Water Issue: कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यावरून महायुती मध्येही संघर्ष पेटला असून भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून थेट राजीनामा देण्याचा इशारा देण्यात आला

विजय पाटील

Sangli Political News:

सांगली आणि सातारा जिल्ह्यात कोयना-कृष्णा पाणी प्रश्नावरुन वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यावरून महायुती मध्येही संघर्ष पेटला असून भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून थेट राजीनामा देण्याचा इशारा देण्यात आला आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर भाजपा खासदार संजयकाका पाटलांवकडून सडकून टीका करत राजीनामा देण्याची आक्रमक भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले संजय काका पाटील?

"पाणी अडवून आमच्या आत्म सन्मानाला ठेच लावण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. असे म्हणत कोयना धरणाचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही, मंत्री देसाई यांची लुडबुड खपवून घेणार नाही.." असे खासदार संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) यांनी दिला आहे. तसेच "पाणी अडवण्याची भूमिका घेणार असाल तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.

फडणवीस- अमित शहांकडे करणार तक्रार...

यावेळी पुढे बोलताना "सांगली जिल्ह्यातील (Sangli) जनतेला भीक मागितल्यासारखी परिस्थिती आणणे ठीक नाही. यावरुन राजकारण केले जात आहे. याबाबत संबंधितांची तक्रार आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंदीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे करणार आहोत," असे संजय काका पाटील म्हणाले.

शंभूराज देसाईंनी मधे पडू नये...

"वीज विकत घेता येईल पाणी नाही. आमच्या पक्षासोबत सत्तेत असलेले लोक राजकारण करत असतील तर ते आम्ही सहन करणार नाही. राजकीय हस्तक्षेप करून जिल्ह्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवली जात असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. कोयना धरण कुणाच्या मालकीचा आहे का? सांगली जिल्ह्याच्या हक्काच्या पाणी प्रश्नाच्या विषयात बाबतीत शंभूराजे देसाईंनी (Shambhuraj Desai) पडू नये" असेही संजय काका पाटील यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT