Citizens were outraged after an acid attack on a child in Sangamner. saam tv
महाराष्ट्र

Sangamner Acid Attack: चिमुरडीवर अॅसिड हल्ला, महिला सुरक्षेवर घाला; महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा येणार?

Sangamner Acid Attack : संगमनेरमधील मुलीवरील अॅसिड हल्ल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. आता रस्त्यापासून विधिमंडळापर्यंत या प्रकरणाचे कसे पडसाद उमटले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कसा ऐरणीवर आलाय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • संगमनेरमध्ये चिमुरडीवर अॅसिड हल्ला.

  • आरोपी अद्याप फरार, पोलिसांचा शोध सुरू.

  • राज्यभर संताप आणि आंदोलन.

अहिल्यानगरात सहावीतल्या चिमुकल्या मुलीवरील अॅसिड हल्ल्याच्या घटनेनं महाराष्ट्राला लाज तर आणलीच. मात्र प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांना या घटनेनं हादरवलंय..मात्र २४ तासांपेक्षा जास्त काळ उलटूनही आरोपी मोकाट असून त्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. त्यामुळेच नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून आरोपीच्या अटकेसाठी थेट रास्ता रोकोच करण्यात आला.

ज्या ठिकाणी मुलीवर अॅसिड हल्ला झाला. तिथे सीसीटीव्ही नसल्याचं उघ़ड झालंय. त्यामुळे मुलींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची टीका युवक काँग्रेसच्या नेत्या जयश्री थोरात यांनी केलीय. दुसरीकडे विधिमंडळातही अॅसिड हल्ल्याचे पडसाद उमटले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अॅसिड हल्ल्यातील गुन्हेगारांसाठी वेगळा कायदा हवा, अशी संतप्त भावना व्यक्त केलीय. तर आरोपीला अॅसिड पुरवणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलयं.

एकीकडे राज्यात महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जातायत. मात्र दुसरीकडे सहावीत शिकणारी एक चिमुकली सुरक्षितपणे घरी जाऊ शकत नसल्याचं महाराष्ट्राला लाज आणणारं धक्कादायक वास्तव या घटनेमुळे समोर आलंय. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची जरब कमी झालीय का? सध्याच्या कायद्याचा धाक संपलाय का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा होणार का? याची आता चर्चा सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: मुंबई हादरली! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ड्रग्जच्या ओव्हर डोसने घेतला जीव

होर्मुझमधून जहाजांची वाहतूक पुन्हा ठप्प?अमेरिकेकडून इराणची सागरी नाकेबंदी

महिला आरक्षण लांबणीवर पडणार? 'महिला आरक्षणाआडून पुनर्रचनेचा डाव'

Crime: भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं; अडथळा ठरणाऱ्या सासूचा काटा काढला

चालत्या गाडीची बदलणारी नंबर प्लेट, वाहतूक दंड टाळण्यासाठी शक्कल

SCROLL FOR NEXT