Buldhana Bus Accident Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Bus Accident: एकाच वेळी २४ चिता; अश्रुंचा पुर अन् काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश! बस अपघातातील मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार

बुलडाण्यातील त्रिशरण चौकातील वैकुंठ स्मशानभूमीत हा अंत्यविधी करण्यात आला. एकाच वेळी पेटलेल्या २४ चिता, नातेवाईकांचा मन सुन्न करणारा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता.

Gangappa Pujari

संजय जाधव,प्रतिनिधी...

Cremation Of Dead Bodies In Buldhana Bus Accident: काल एक जुलैच्या पहाटे झालेल्या भीषण बस अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्यात खाजगी ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात 26 प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला.

या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील अनेकांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. अपघातात बस पुर्णपणे जळून खाक झाल्याने मृतदेहांची ओळख पटवण्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळेच आज या सर्व मृतदेहांवर सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला...

काल झालेल्या भीषण बस अपघातात २६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अनेक स्वप्न, कामे घेवून पुण्याकडे निघालेल्या या २६ जणांवर काळाने झडप घातली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

अपघातानंतर बस पुर्णपणे जळून खाक झाल्याने मृतदेहांची ओळख पटवणार कशी असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित होता. डीएनए चाचणीकरुनही अनेक अडचणी आल्याने अखेर या २६ जणांवर सामुहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामधील एका मृतदेहाची ओळख पटल्याने त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

अखेरचा प्रवासही सोबत..

बुलढाणामधील जिल्हा रुग्णालयातील शवागृहात ठेवलेल्या मृतदेहांना वेगवेगळ्या 5 स्वर्ग रथामध्ये ठेवण्यात आले. स्वर्ग रथामध्ये चार आणि सहा मृतदेह ठेवण्यात आले. एकाचवेळी अंत्ययात्रा बुलढाणा शहरातून निघाली. सर्व मृतांचा अखेरचा प्रवास एकत्रित होता. अत्यंत शोकाकुल वातावरणात तो प्रवास स्मशानभूमीत पोहचला.

एकाच वेळी २४ चिता..

बुलडाण्यातील त्रिशरण चौकातील वैकुंठ स्मशानभूमीत हा अंत्यविधी करण्यात आला. एकाच वेळी पेटलेल्या २४ चिता, नातेवाईकांचा मन सुन्न करणारा आक्रोश अन् आपला मृतदेह कोणता हे सुद्धा माहित नसल्याने रडायचं कुणासाठी हाच पडलेला प्रश्न.. हे सगळ पाहताना प्रत्येक जण मुका झाला होता.

नातेवाईकांचा आक्रोश अन् किंचाळ्या..

अखेरचा निरोप देताना ज्यांनी आपला मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण गमावला त्या प्रत्येकाची इच्छा होती, शेवटचे तरी पाहून घ्यावं, पण ते शक्य नव्हतं. घरातून निघालेली भेटच त्या सर्वांची शेवटची भेट ठरली. यावेळी काही नातेवाईकांना अचानक त्रास झाल्यानं अम्ब्युलन्समध्ये उपचार करण्यात आले.

दरम्यान, जवळपास 2 तास इतका वेळ अंत्यसंस्कारसाठी लागला. पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार श्वेता महाले, संजय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दुःखद संवेदना व्यक्त केल्या. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

SCROLL FOR NEXT