नवनीत तापडिया
छत्रपती संभाजीनगर : मागील काही महिन्यांमध्ये राज्यभरात तणावाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोशल मीडियावर धार्मिकतेड निर्माण करणाऱ्या पोस्टही वाढल्या आहेत. यामुळे पोलिसांनी याबाबत आता कडक भूमिका घेतली असून सायबर पोलीस (Cyber Police) ठाण्यात प्रत्यक्ष पेट्रोलिंग (Sambhajinagar) प्रमाणेच २४ तास सोशल मीडिया पेट्रोलिंग सुरू झाली आहे. यामुळे सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्टवर कमेंट लाईक कराल तर नोकरी गमावून बसण्याची वेळ येऊ शकते. (Tajya Batmya)
सोशल मीडियावर फक्त आक्षेपार्ह किंवा अश्लील पोस्ट करणे गुन्हा नसून त्याला प्रतिसाद देणेही तितकाच गंभीर गुन्हा ठरू शकतो. कारण त्या गुन्ह्यात सहभागी होण्याची ते कृत्य समजले जाऊ शकते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास त्याची कायमस्वरूपी नावावर नोंद राहते. कुठल्याही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, नामांकित कंपन्या संस्थांमध्ये आता चारित्र्य प्रमाणपत्राची मागणी करतात. यामुळे असे गुन्हे दाखल असल्यास ते प्रमाणपत्र मिळत नाही, शिवाय कंपन्यांना त्याची माहिती मिळते. त्यामुळे थेट करिअरच पणाला लागते. अशा प्रकारचे व्हिडिओ संदेश विनाकारण व्हायरल करून जाणीवपूर्वक अफवा पसरताना आढळल्यास त्याविरुद्ध 153, 153 (अ), 295 (अ) अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल होऊन तीन वर्षांपर्यंत करावास व दंडाची तरतूद आहे.
संभाजीनगर जिल्ह्यात ९४ तरुणांवर गुन्हे
मागील सहा महिन्यांमध्ये राज्यभरात वाढलेल्या तणावाच्या घटनांमुळे पोलिसांनी सोशल मीडियावर २४ तास पेट्रोलिंग सुरू केली. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी शहर सायबर पोलीस ठाण्यात स्वतंत्र २४ कर्मचारी कार्यरत राहण्याचे आदेश दिले आहेत. तर ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात देखील पोलीस अधीक्षक मनीष कलमानिया यांनी स्वतंत्र पथक नियुक्त केले विविध टूल्सद्वारे (Social Media) आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना ठाण्यात उभे केले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अशा तब्बल ९४ तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील काही तरुणांना बोलावून नोटीस समज देण्यात आली. विशेष म्हणजे यात ९० टक्के आरोपी हे विशीच्या आतले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.