Samruddhi Highway Accident: अपघातातील मृतांची ओळख पटविण्यात अडचण, कुटुंबियांशी चर्चा करून सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय

Buldhana Travels Bus Accident: बुलढाणा येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वर्धा येथील मृतांवर रविवारी बुलढाण्यात सामूहिक अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accidentsaam tv
Published On

>> चेतन व्यास, साम टीव्ही

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्यात खाजगी ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात 26 प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला. यात वर्ध्यातील 14 लोकांचा समावेश होता. या सर्वांवर रविवारी बुलढाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात भाजले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलढाण्यात त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाणा येथे गेलेले वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे.

Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Highway Accident: लग्नाचा वाढदिवस साजरा करुन ती पुण्याला निघाली; गाढ झोपेत काळाची झडप, पती-पत्नीची ताटातूट

या अपघाताची माहिती मिळताच ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या प्रवाशांचे नातेवाईक आधीच बुलढाणा येते पोहोचले आहेत. अपघाताविषयी कळताच वर्धा जिल्हा प्रशासनाचे दोन पथक आणि पोलिसांचे दोन पथक देखील बुलढाण्यात दाखल झाले आहे. प्रशासनाकडून या अपघातात मृत्यू झालेल्या वर्धा येथील मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जातं आहे. (Breaking News)

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला. बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावरून जात असताना मध्यरात्री विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी लक्झरी बसला हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ३० प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. यातील काही जणांना बसमधून वेळीच बाहेर पडण्यात यश आल्याने त्यांचे प्राण वाचले. (Marathi Tajya Batmya)

Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Highway Accident : एकुलता एक कमावता मुलगा, बहिणीला माहेरी आणायला निघाला; काळानं हिरावला, अख्खं गाव हळहळलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला असून बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाखांची, तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com