Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News Updates, Kolhapur News Updates, Sambhajiraje latest news in Marathi Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News: संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं, लवकरच माेठा निर्णय घेणार!

संभाजीराजे छत्रपती यांनी काेल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला.

संभाजी थोरात

काेल्हापूर : येत्या तीन मे राेजी राज्यसभेच्या खासदार पदाचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर वेगळी दिशा घेणार आहे. तोपर्यंत सर्वांनी वाट पहा असं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांनी आज (मंगळवार) काेल्हापूर (kolhapur) केले आहे. संभाजीराजे यांच्या या वक्तव्यामूळ राजे पुढे काय भूमिका घेणार यांची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Sambhajiraje latest news in Marathi)

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे गेली सहा वर्षे मी काेणाचा ही प्रचार केलेला नाही. येत्या तीन मे राेजी माझा कार्यकाल संपत आहे. सरकारनं जे काही आश्वासन दिले हाेते. ते सर्वच पुर्ण झाले नाही हे मी मान्य करताे. त्याचा पाठपूरावा सुरु आहे. सरकारनं शब्द दिला आहे काही गाेष्टींची पुर्तता करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मी माझी भुमिका पार पाडली आहे. सरकार आणि विराेधी पक्ष यांनी ठरवावे काय मार्गी लावायचे आणि काय नाही. माझा एकच हेतू हाेता गरीबांचे कल्याण व्हावे असे राजेंनी म्हटलं.

दरम्यान काेल्हापूरच्या पाेटनिवडणुकीत (kolhapur byelection) राजकीय पक्षांच्या (political parties) माध्यमातून पैशांचे वाटप झाले या प्रश्नावर खासदार संभाजीराजे म्हणाले पैसे वाटणे हे गैर आहे. चुकीच्या मार्गाने निवडणुका हाेऊ नयेत अशी माझी भुमिका आहे. त्यामुळेच अन्य राज्यकीय पुढा-यांपेक्षा (politician) मी वेगळा आहे असेही खासदार संभाजीराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

SCROLL FOR NEXT